किल्ले लोहगडावरून उडी मारून LLB चं शिक्षण घेणाऱ्या तरूणीनं संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 22:05 IST2025-03-20T22:04:46+5:302025-03-20T22:05:32+5:30
गडाच्या रिवर्स वाटरफाँलच्या कड्यावरून शिक्षणाच्या नैराश्यातून उडू मारुन आत्महत्या केली.

किल्ले लोहगडावरून उडी मारून LLB चं शिक्षण घेणाऱ्या तरूणीनं संपवलं आयुष्य
पवनानगर - मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगड गडावरून उडी मारून उच्चशिक्षित तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसी गोपाळ गोविंदपुरकर (वय.२१) वर्षे, रा.घोडे बिल्डींग, भिमाशंकर कॉलनी, पिंपळे गुरव पुणे मुळ रा. गोदावरी निवास, सावेवाडी, वसंतनगर जि. लातुर ही (दि.१८) रोजी सकाळी ०७:३० कॉलेजला जाण्यासाठी घरातून निघून गेली व कॉलेजला न जाता ती एकटी मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड येथे (दि.१८)रोजी सकाळी ९ च्या सुमारास पोहचली.
गडाच्या रिवर्स वाटरफाँलच्या कड्यावरून शिक्षणाच्या नैराश्यातून उडू मारुन आत्महत्या केली. यावेळी तिच्या मामानी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांच्या मदतीने तिचे मोबाईल लोकेशन मावळ तालुक्यातील लोहगड परिसरात असल्याने निदर्शनास आल्यावर पोलिसांनी वेगाने तपास कार्य सुरू केले. यावेळी (दि.२० मार्च )रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास तिचा मृतदेह लोहगड गडाच्या पायथ्याशी मिळून आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रंशात आवारे, पोलीस हवालदार जय पवार हे तपास करत आहे.