Pimpri Chinchwad Fire: त्रिवेणीनगरमध्ये मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 17:09 IST2024-03-21T17:06:24+5:302024-03-21T17:09:45+5:30
गोदामतील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले...

Pimpri Chinchwad Fire: त्रिवेणीनगरमध्ये मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग
निगडी (पुणे) : तळवडे त्रिवेणीनगर येथील स्पाईन रस्ता येथे (दि. २१) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास मंडप साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली. मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला ही आग लागली असून, सुदैव इतकंच की कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र गोदामतील सर्व साहित्य आगीत जळून खाक झाले. अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी असून अग्निशमन दलाला आग विझविण्यात यश आले आहे. अशी माहिती तळवडे येथीलउप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांनी दिली.
Pimpri Chinchwad: त्रिवेणीनगरमध्ये मंडप साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग#fire#pimprichinchwadpic.twitter.com/bsbJxNI66G
— Lokmat (@lokmat) March 21, 2024