दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळ्याला फास; रक्तबंबाळ अवस्थेत तरुण रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 04:33 PM2023-01-18T16:33:19+5:302023-01-18T16:33:28+5:30

नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही हा मांजा बाजारात उपलब्ध होत असल्याने नागरिक संतप्त

A nylon rope around the neck while riding a bike The young man was admitted to the hospital in a pool of blood | दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळ्याला फास; रक्तबंबाळ अवस्थेत तरुण रुग्णालयात दाखल

दुचाकीवरून जाताना नायलॉन मांजाने गळ्याला फास; रक्तबंबाळ अवस्थेत तरुण रुग्णालयात दाखल

Next

चिंचवड : भोसरीतील उड्डाणपुलावरून मोशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरून जाणाऱ्या एक तरुण मांजाचा फास बसल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी घडली. या घटनेमुळे घातक ठरणाऱ्या मांजा विक्रीचा मुद्दा समोर आला आहे.

शहरात नायलॉन मांजामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या मांजाचा फास बसल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. चिंचवडमधील एक तरुण सायंकाळी सहा वाजता भोसरीमधून मोशीकडे दुचाकीवरून जात असताना अचानक त्याच्या गळ्याभोवती मांजा अडकला. मांजामुळे गळ्याभोवती फास बसला. मांजा काढताना हाताचा अंगठा फाटला. रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नायलॉन मांजा विक्री व वापरावर बंदी असतानाही अशा प्रकारचा मांजा बाजारात उपलब्ध होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नायलॉन मांजा विक्रीबाबत पोलिसांनी कठोर कारवाई करणे महत्त्वाचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: A nylon rope around the neck while riding a bike The young man was admitted to the hospital in a pool of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.