कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील पुलावरून व्यक्ती गेला वाहून; शोधमोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 12:59 PM2024-07-06T12:59:12+5:302024-07-06T12:59:29+5:30

लोणावळा ( पुणे ) : कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. ...

A person was swept away from the bridge over the Indrayani river between Karla-Malvali; The search begins | कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील पुलावरून व्यक्ती गेला वाहून; शोधमोहीम सुरू

कार्ला-मळवली दरम्यान इंद्रायणी नदीवरील पुलावरून व्यक्ती गेला वाहून; शोधमोहीम सुरू

लोणावळा (पुणे) : कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पुलाच्या रुंदीकरण व नूतनीकरणाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. त्या पुलाच्या शेजारी बांधण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार्ला येथील एक व्यक्ती वाहून गेली आहे. तिचा शोध सकाळपासून सुरू असून, अद्याप शोध लागलेला नाही. भीमा पवार (वय अंदाजे ५० वर्ष, रा. कार्ला, ता. मावळ) असे या वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कार्ला मळवली दरम्यान असलेल्या इंद्रायणी नदीवरील पूल जीर्ण झाला असल्याने तो पूल पाडून त्या ठिकाणी नव्याने मोठा व रुंद पूल बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र त्या मागणीकडे काहीशी दुर्लक्ष झाल्याने पावसाळा सुरू झाला, तरी पुलाचे काम मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. या नवीन पुलाच्या शेजारी नागरिकांना ये-जा करण्यासाठी नदीपात्रामधून पर्यायी रस्ता बनवण्यात आला होता. पहिल्याच पावसामध्ये हा पूल पाण्याखाली केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यावर काही प्रमाणात भरणी केली होती. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसात या पुलावरून पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी बंद केला होता.

एक व्यक्ती पुलावरून वाहून गेल्याची माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग पथक व प्रशासकीय यंत्रणा तसेच स्थानिक नागरिक यांनी शोधमोहीम सुरू केली आहे. नदीपात्रात जलपर्णी असल्याने शोध कार्यात काहीसा अडथळा येत आहे.

Web Title: A person was swept away from the bridge over the Indrayani river between Karla-Malvali; The search begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.