पोटनिवडणूकीच्या रणधुमाळीत भाजपला धक्का; चिंचवडमध्ये माजी नगरसेवकाचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 09:31 PM2023-02-15T21:31:20+5:302023-02-15T21:31:34+5:30
चिंचवडमध्ये भाजपा, महाविकास आघाडी आणि शिवसेना बंडखोर अशी तिरंगी लढत
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे राजीनामा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सदस्यांची कालावधी मार्च २०२२ मध्ये संपली आहेत. त्यानंतर अकरा महिने होत आले. मात्र, अजूनही महापालिकेची निवडणूक जाहिर झालेली नाही. त्यामुळे प्रशासकीय राजवट आहे. तर आता चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक सुरू आहे. भाजपा, महाविकास आघाडी आणि शिवसेना बंडखोर अशी तिरंगी लढत होत आहे.
आम आदमी पक्षाच्या एबी फॉर्मचा गोंधळ झाल्यानंतर आता भाजपाचे माजी नगरसेवक कामठे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्रात कशामुळे राजीनामा देत आहे, याबाबत काहीही नमूद केलेली नाही. त्यामुळे कामठे यांच्या राजीनाम्याबाबत गुढ वाढले आहे.