Pimpri Chinchwad: साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; तिघांकडून अत्याचार करून अश्लील चित्रीकरण
By नारायण बडगुजर | Updated: October 17, 2024 18:03 IST2024-10-17T18:02:40+5:302024-10-17T18:03:02+5:30
पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून अश्लील चित्रफित तयार केली

Pimpri Chinchwad: साॅफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य; तिघांकडून अत्याचार करून अश्लील चित्रीकरण
पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून त्याचे अश्लिल चित्रीकरण केले. पुनावळे येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
याबाबत ३० वर्षीय महिलेने बुधवारी (दि. १६) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पीडित महिलेच्या पतीसह चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती देखील साॅफ्टवेयर इंजिनियर आहे. तिच्या पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. तसेच या अत्याचाराची अश्लिल चित्रफित तयार केली. ती चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही केले. यास विरोध केला असता तिला शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.