ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, मुळशी तालुक्यातील घटना

By नारायण बडगुजर | Published: March 6, 2024 07:03 PM2024-03-06T19:03:29+5:302024-03-06T19:03:57+5:30

ट्रॅक्टर चालक रितेश शिवलाल तुनगर (३१, रा. असोला, ता. मानोरा, जि. वाशीम) याला पोलिसांनी अटक केली....

A toddler died after being crushed under the wheels of a tractor, an incident in Mulshi taluka | ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, मुळशी तालुक्यातील घटना

ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, मुळशी तालुक्यातील घटना

पिंपरी : ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. मुळशी तालुक्यातील जांबे येथील जय हिंद कोलते पाटील लेबर काॅलनी येथे सोमवारी (दि. ४) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. ट्रॅक्टर चालक रितेश शिवलाल तुनगर (३१, रा. असोला, ता. मानोरा, जि. वाशीम) याला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सिबुकुमार नेमुलाल शर्मा (१९, रा. जय हिंद कोलते पाटील लेबर कॉलनी, जांबे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर मागे घेत होता. त्यावेळी ट्रॅक्टरच्या मागे फिर्यादी सिबुकुमार यांचा दीड वर्षीय पुतण्या खेळत होता. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने सिबुकुमार यांच्या पुतण्याला धडक दिली. यात चाकाखाली चिरडून मुलाचा मृत्यू झाला.

Web Title: A toddler died after being crushed under the wheels of a tractor, an incident in Mulshi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.