भरधाव दुचाकी डीव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात तरुणी ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 15:40 IST2022-09-28T15:36:45+5:302022-09-28T15:40:01+5:30
हा अपघात पिंपळे गुरव हद्दीतील सुदर्शन ब्रीजखाली झाली...

भरधाव दुचाकी डीव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात तरुणी ठार
पिंपरी : भरधाव दुचाकी डीव्हायडरला धडकून झालेल्या अपघातमध्ये दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाला तर, दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव अभिषा दिलीप कुमार पांडा (वय २४) असे आहे.
हा अपघात पिंपळे गुरव हद्दीतील सुदर्शन ब्रीजखाली शुक्रवारी (दि. २३) मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विकास अर्जुन खामकार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार दुचाकीचालक क्षितीज कुमार सुलेख (वय २५, रा. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातमध्ये दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाला असून दुचाकीचालक तरुण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे.