किरकोळ वादातून अपहरण; चिपळूणच्या तरुणाचा वडगाव मावळात दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 01:15 PM2023-03-21T13:15:16+5:302023-03-21T13:15:37+5:30

पोलिसांनी दोन तासांत खून करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली.

A youth of Chiplun was crushed to death by a stone in Vadgaon Maval | किरकोळ वादातून अपहरण; चिपळूणच्या तरुणाचा वडगाव मावळात दगडाने ठेचून खून

किरकोळ वादातून अपहरण; चिपळूणच्या तरुणाचा वडगाव मावळात दगडाने ठेचून खून

googlenewsNext

वडगाव मावळ : किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघांनी एका तरुणाचे अपहरण केले. तसेच त्याला साते गावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी घडली. पोलिसांनी दोन तासांत खून करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली.

सौरभ शैलेंद्र मयेकर (वय २१, मूळ गाव रा. वालोपे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. सध्या रा. एक्झारबीया सोसायटी, जांभूळ, ता. मावळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सक्षम शंकर आनंदे (वय १८, रा. व्हिजन सिटी, जांभूळ) व दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनीअटक केली आहे. यातील एक अल्पवयीन आरोपी जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे.

पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, साैरभ मयेकर याची आरोपींसोबत जांभूळ रोडवर भांडणे झाली होती. यात सक्षम आनंदे याच्या पाठीवर कटर मारले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मयेकर याची गाडी अडवून त्याचे अपहरण केले. ब्राह्मणवाडी साते गावच्या हद्दीत असलेल्या खापरे ओढ्याजवळ नेऊन त्याला मारहाण केली तसेच डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.

दोन तासांत गुन्हा उघड

खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी तातडीने दोन पथके तयार केली. मोबाइल लोकेशनच्या आधारे दोन तासांमध्येच तिन्ही आरोपींना पिंपरी-चिंचवड येथून अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक सुनील जावळे, सुनील मगर, अमोल कसबेकर, आशिष काळे, श्रीशैल कंटोळी, अमोल तावरे, सागर गाडेकर, गणेश होळकर, चेतन कुंभार, महिला पोलिस निर्मला उप्पू, केतकी सपकाळ, अर्चना मोरे, होमगार्ड सुरेश शिंदे यांनी ही कामगिरी केली.

Web Title: A youth of Chiplun was crushed to death by a stone in Vadgaon Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.