तळेगावात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:38 AM2018-11-11T00:38:04+5:302018-11-11T00:38:27+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ साळवे हे तळेगावातील त्यांच्या चहाच्या स्टॉलवर थांबले होते. त्या वेळी एका मोटारीतून चौघे जण खाली उतरले.

Aartosity complaint filed in Talegaon | तळेगावात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

तळेगावात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

googlenewsNext

पिंपरी : जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी गुरुवारी एकाविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ महेंद्र साळवे (रा. यश्वंतनगर, तळेगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. तर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव किशोर आवारे असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिद्धार्थ साळवे हे तळेगावातील त्यांच्या चहाच्या स्टॉलवर थांबले होते. त्या वेळी एका मोटारीतून चौघे जण खाली उतरले. त्यातील किशोर आवारीच्या हातात लाकडी दांडके होते. तर प्रमोद सांडभोर याच्या हातात कोयता होता़ आर्ची, परशा या नावाचा उल्लेख होत असलेले आणखी दोन जण त्यांच्याबरोबर होते. हातात लाकडी दांडके घेतलेला आरोपी किशोर आवारे शिवीगाळ करू लागला. आकाश साळवे तुझा भाऊ आहे, त्याला बघून घेतो. त्याचा खूनच करतोे, असे म्हणत जातीवाचक उल्लेख करीत त्याने मारहाण केली. त्याचवेळी त्याच्याबरोबर हातात कोयता घेऊन आलेल्या प्रमोद सांडभोर यानेही मारहाण केली. आर्ची आणि परशा नामक दोघांनी दगड आणि विटांनी मारहाण केली, असे फिर्यादीने जबाबात नमूद केले आहे. जखमी झालेल्या फिर्यादीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Web Title: Aartosity complaint filed in Talegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.