आयुक्तांकडे राजकीय पक्षांचे एबी फॉर्म

By admin | Published: February 1, 2017 10:44 PM2017-02-01T22:44:04+5:302017-02-01T22:44:04+5:30

आयुक्तांकडे राजकीय पक्षांचे एबी फॉर्म

AB Form of Political Parties to the Commissioner | आयुक्तांकडे राजकीय पक्षांचे एबी फॉर्म

आयुक्तांकडे राजकीय पक्षांचे एबी फॉर्म

Next

 

पिंपरी : राजकीय पक्षांकडून उमेदवारांना ए व बी फॉर्म देण्याऐवजी त्या पक्षांचे नेमून दिलेले पदाधिकारी थेट महापालिका आयुक्तांना सर्व उमेदवारांचे ए व बी फॉर्म एकाच वेळी देऊ शकतील असे आदेश बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून काढण्यात आले आहेत. पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने इतर पक्षामध्ये जाऊन बंडखोरी करू इच्छिणाºया उमेदवारांना या निर्णयामुळे मोठा फटका बसणार आहे. 

महापालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना राज्य निवडणुक आयोगाकडून अचानक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र आतापर्यंत एकाही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आलेली नाही. यापार्श्वभुमीवर पक्षांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाने ए व बी फॉर्म देण्याच्या प्रक्रियेत बदल केले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवारांना ए व बी फॉर्मचे वाटप करून ते त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे जमा करण्याऐवजी  

राजकीय पक्षाने निवडणुकीची उमेदवारी देण्याची जबाबदारी कोणावर सोपविली आहे ‘ए’ फॉर्ममध्ये स्पष्ट करण्यात आलेले असते तर ‘बी’ फॉर्ममध्ये राजकीय पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली आहे त्याची माहिती दिलेली असते. राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांनी ए व बी फॉर्म निवडणूक अधिकाºयांकडे विहीत वेळेत जमा करणे आतापर्यंत बंधनकारक होते. ए व बी फॉर्म निवडणुक अधिकाºयांकडे दिले तरच त्यांची राजकीय पक्षाची उमेदवारीला मान्यता दिली जायची. निवडणुक आयोगाने बुधवारी अचानक या प्रक्रियेमध्येच मोठे बदल केले आहेत. 

 

Web Title: AB Form of Political Parties to the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.