अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 01:19 AM2018-09-09T01:19:23+5:302018-09-09T01:19:30+5:30

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत.

The abducted girls are still unconscious | अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच

अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच

googlenewsNext

पिंपरी : अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत. पळून जाऊन विवाहबद्ध होणाऱ्या मुलींमध्ये अशा अपहरण प्रकरणातील मुलींचे प्रमाण अधिक आहे.
शहरातून बेपत्ता होणा-या मुलींमध्ये १५ ते १६ वर्षांच्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलगी घरातून निघून गेल्यानंतर पालक पोलीस ठाण्यात धाव घेतात. अपहरण झाल्याची फिर्याद दाखल करतात. अनेकदा मुलीचे अपहरण करणा-या संशयित आरोपींविषयी पालक पोलिसांकडे तक्रार करतात. या संशयित आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर मुलगी कोठे पळवून नेली याचा तपास लागू शकतो. मात्र १६ ते १७ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत.
दरम्यान, १८ वर्षे पूर्ण होताच, विवाहबद्ध होण्याच्या तयारीने अशा मुलींचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा अंदाज व्यक्त करून पोलीस या प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपहरण झालेल्या मुलींचा शोध लागण्याचे प्रमाण नगण्य आहे.
>पोलिसांकडे कमी नोंद
वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणी घरातून बेपत्ता होतात, त्यांच्याबाबत पालक पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यासही धजावत नाहीत. अशा घटनांची पोलिसांकडे कमी प्रमाणात नोंद होताना दिसून येते. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. अपहरण होणा-या मुलींमध्ये शाळकरी आणि नुकतेच महाविद्यालयात पदार्पण केलेल्या मुलींचे प्रमाण अधिक आहे.
>अपहरणाच्या घटनांत वाढ
मोशीतून अपहरण करून तरुणीचा जबरदस्तीने मुंबई येथे विवाह लावण्यात आल्याची घटना १३ एप्रिल २०१८ ला घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चार जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पिंपरीतील संजय गांधीनगर येथून १६ वर्षीय मुलीचे मागील महिन्यात अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत.

Web Title: The abducted girls are still unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.