अपहरणप्रकरणी तपासात दिरंगाई?
By admin | Published: March 20, 2017 04:23 AM2017-03-20T04:23:37+5:302017-03-20T04:23:37+5:30
वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या शाळकरी मुलीचा तपास लावण्यात इंदापूर पोलीस
इंदापूर : वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) येथून दोन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेल्या शाळकरी मुलीचा तपास लावण्यात इंदापूर पोलीस दिरंगाई करत असल्याने, असहाय झालेल्या तिच्या आईने अपहरण करणाऱ्यास अटक करण्याच्या मागणीसाठी दि. २९ मार्चपासून
थेट पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदनही तिने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे पाठवले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वरकुटे खुर्द येथील १५ वर्षांची मुलगी शाळेतून घरी परतलीच नाही. दरम्यान, वाघाळेमळानजीक (काटी) येथील एका तरुणाने मुलीस पळवून नेल्याचे मुलीच्या घरच्यांना सांगितले. मात्र, त्याची दखल घेऊन पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याच्या हालचाली झाल्या नाहीत. (वार्ताहर)