शहरात गर्भपात प्रमाण चिंताजनक

By admin | Published: March 27, 2016 02:54 AM2016-03-27T02:54:02+5:302016-03-27T02:54:02+5:30

शहरात गर्भपाताचे प्रमाण वाढत असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. वर्षाला सुमारे १३ हजार गर्भपात होत आहेत. महिलांच्या आरोग्यासह गर्भपात करण्यासाठीच्या कारणांकडे गांभीर्याने

The abortion certification in the city is alarming | शहरात गर्भपात प्रमाण चिंताजनक

शहरात गर्भपात प्रमाण चिंताजनक

Next

पिंपरी : शहरात गर्भपाताचे प्रमाण वाढत असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. वर्षाला सुमारे १३ हजार गर्भपात होत आहेत. महिलांच्या आरोग्यासह गर्भपात करण्यासाठीच्या कारणांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. गर्भपात करताना सबळ कारण सादर करणे आवश्यक असते. बाळाला धोका असणे, आईला धोका असणे, गर्भाशयाचा त्रास, लैंगिक अत्याचाराच्या घटनेतून झालेली गर्भधारणा अशावेळी वीस आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे.
महापालिका रुग्णालयासह शहरात इतरही अधिकृत गर्भपात केंद्र आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षभरात १३ हजार गर्भपाताची प्रकरणे घडली आहेत. गर्भपाताचे प्रमाण कमी होण्यासाठी महिलांच्या आरोग्यासह जनजागृतीकडेदेखील लक्ष देणे गरजेचे बनले आहे. गर्भवती मातेचा आहार, व्यायाम, मार्गदर्शन यासह उपचारही महत्त्वाचे आहेत.
गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. तरीही बेकायदारीत्या बाळाची लिंगचाचणी करून गर्भपात करण्याचे प्रकार घडत आहेत. वंशाचा दिवा हवा या अपेक्षेने गर्भपात केला जात असून, यामुळे एक कळी उमलण्याआधीच कोमेजून जाते, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
गर्भपाताचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती आणि समाजप्रबोधन गरजेचे आहे. मुलाप्रमाणे मुलगीदेखील वंशाचा दिवा आहे. या साध्या गोष्टी समजल्यास गर्भपातासारखे प्रकार थांबण्यास मदत होऊ शकेल, असे मत व्यक्त केले जात आहे.(प्रतिनिधी)

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत २०१३-१४ या आर्थिक वर्षात १३ हजार ६२० गर्भपात करण्यात आले, तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात १३ हजार ३६३ गर्भपात झाले. दोन वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण तीनशेने घटले असले, तरी वर्षातील एकूण आकडा मोठा आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीतही ८ हजार ७०९ गर्भपात झाले. कायद्याने अथवा बेकायदारीत्या होत असलेले गर्भपाताचे प्रकार चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

कायदेशीररीत्या गर्भपात करतानाही त्याबाबतची रीतसर परवानगी हवी असते. त्यातच अधिकृत केंद्रातच गर्भपात करणे बंधनकारक आहे. नियमानुसार गर्भपात करताना तो कोठे करणार आहे, कोण करणार आहे, कशासाठी करणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती सादर करणे आवश्यक असते. त्यानंतरच गर्भपात करण्यास परवानगी मिळते. परवानगीशिवाय गर्भपात केल्यास तीन ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

Web Title: The abortion certification in the city is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.