पित्याकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जाब विचारल्याने पत्नीला घरातून बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:00 PM2022-03-16T18:00:20+5:302022-03-16T18:02:37+5:30

पित्याने गैरकृत्य करून केला मुलीचा विनयभंग

abuse of a minor daughter by a father chinchwad latest crime news | पित्याकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जाब विचारल्याने पत्नीला घरातून बाहेर काढले

पित्याकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जाब विचारल्याने पत्नीला घरातून बाहेर काढले

Next

पिंपरी : अल्पवयीन मुलीसोबत तिच्या पित्याने गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला. याचा जाब मुलीच्या आईने विचारला असता तिला मुलीच्या पित्याने घरातून हाकलून दिले. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे मंगळवारी (दि. १५) पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

पीडित १६ वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, तिचा पती, दोन मुले आणि पीडित अल्पवयीन मुलगी हे त्यांच्या राहत्या घराच्या हाॅलमध्ये झोपले होते. त्यावेळी अल्पवयीन पीडित मुलगी झोपेतून घाबरून उठली. अम्मी देखो कौन है, असे पीडित मुलगी म्हणाली. काय झाले, असे फिर्यादी महिलेने पीडित मुलीला विचारले. अम्मी कुछ भी नही हुआ, असे म्हणून पीडित मुलगी झोपली.

रात्री काय झाले होते, असे सकाळी फिर्यादीने पीडित मुलीला विचारले. अब्बू रात्री माझ्या पायाजवळ बसून गैरकृत्य करीत होते. त्यामुळे मी मोठ्याने ओरडून झोपेतून उठली होते. त्यावेळी अब्बू त्यांच्या जागेवर जावून झोपले होते. मागील १५ दिवसांपासून अब्बू माझ्यासोबत रोज रात्री अश्लील कृत्य करीत आहेत, असे पीडित मुलीने तिच्या आईला रडत रडत सांगितले. तू मला यापूर्वीच का सांगितले नाही, असे फिर्यादीने पीडित मुलीला विचारले. मैने आपको बताया होता तो अब्ब रोजकी तरह आपके साथ झगडे करता, इसके वजह मै डर गयी थी, असे पीडित अल्पवयीन मुलीने सांगितले.

त्यानंतर फिर्यादीने आरोपी पतीला याबाबत जाब विचारला. त्यामुळे आरोपी पतीने शिवीगाळ करून घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. तसेच घरातून हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: abuse of a minor daughter by a father chinchwad latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.