बाणेरमध्ये मामाकडून भाचीवर अत्याचार; ३७ वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 13:04 IST2023-01-19T13:03:32+5:302023-01-19T13:04:00+5:30
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मामाकडून भाचीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना सात जानेवारी २०१९ ते २३ डिसेंबर २०२२ ...

बाणेरमध्ये मामाकडून भाचीवर अत्याचार; ३७ वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून मामाकडून भाचीवर अत्याचार करण्यात आला. ही घटना सात जानेवारी २०१९ ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत बाणेर परिसरात घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ३७ वर्षीय आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने भाची-मामा आहे. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.