मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 09:49 PM2021-08-07T21:49:36+5:302021-08-07T21:49:52+5:30

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला.

Abusing and beating a women over an argument over speeding after a friend's party; Incident at Kiwale | मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना 

मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्याच्या वादातून महिलेला शिवीगाळ करून मारहाण; किवळे येथील घटना 

Next

पिंपरी : मित्राच्या पार्टीनंतर गाडी जोरात चालवण्यावरून एका महिलेचा इसमाशी वाद झाला. त्यावेळी त्या इसमाने महिलेला शिवीगाळ केली. महिला घरी गेल्यावर या इसमाने ४ ते ५ जणांच्या टोळक्यासह महिलेच्या घरी जाऊन तिच्या लहान भावाला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माळवडेनगर, किवळे या ठिकाणी बुधवारी हा प्रकार घडला.
याप्रकरणी महिलेने शुक्रवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदू झोंबाडे, शार्दूल ठाकूर यांच्यासह इतर चार ते पाच इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या मित्राच्या पार्टीत गेल्या होत्या. ड्रिंक घेतली असल्याने त्या बाहेर येऊन हॉर्न वाजवत गाडी घेऊन आल्या. त्यावेळी आरोपी चंदू झोंबाडे याने फिर्यादी यांना अडवून जोरात गाडी का चालवता याबाबत विचारणा केली. यावरून फिर्यादी, त्यांचा भाऊ यांना आरोपीने शिवीगाळ केली. फिर्यादी याच्या भावाने भांडण मिटवून फिर्यादी यांना घरी घेऊन गेले.

त्यांनतर आरोपी यांनी आरोपी शार्दूल ठाकूर यांच्यासह इतर चार ते पाच इसमांसोबत फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या भावला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Abusing and beating a women over an argument over speeding after a friend's party; Incident at Kiwale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.