पिंपरी-चिंचवड दर्शनासाठी ‘एसी’ बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:41 AM2018-06-07T02:41:39+5:302018-06-07T02:41:39+5:30
पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर महापालिकेतर्फे पिंपरी-चिंचवड दर्शनसाठी विशेष वातानुकूलित १० बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
पिंपरी : पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर महापालिकेतर्फे पिंपरी-चिंचवड दर्शनसाठी विशेष वातानुकूलित
१० बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती
भाजपाचे नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे औद्योगिकनगरीतील विविध प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक वास्तू, तसेच आयटीनगरीची पाहणी करण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध व्हावी. यासाठी ही बससेवा सुरू करण्याचे पीएमपीचे नियोजन आहे. त्यासाठी ९०० एमएम फ्लोअरच्या नामांकित कंपन्यांच्या व आॅटोमेटिक ट्रान्समिशनच्याबीआरटीएसच्या दहा बस खरेदी करण्यात येणार आहेत.
महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थी वाहतुकीसाठी खासगी बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. चोविसावाडी शाळा क्रमांक २० आणि यशवंतनगर
शाळा यातील अंतर तीन किलोमीटर आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रेम टूर्स अॅड ट्रॅव्हल्स या कंपनीला ठेका देण्यात आला आहे.