ऑईल गळती झाल्याने दुचाकी घसरून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 02:31 AM2019-03-01T02:31:06+5:302019-03-01T02:31:10+5:30

डांगे चौक-चिंचवड मार्ग : तरुणांची तत्परता; अग्निशामक दलाला केले पाचारण

Accident due to a two-wheel collapse due to oil spill | ऑईल गळती झाल्याने दुचाकी घसरून अपघात

ऑईल गळती झाल्याने दुचाकी घसरून अपघात

Next

थेरगाव : येथील डांगे चौककडून चिंचवडला जाणाऱ्या मार्गावर बारणे चाळ ते रोझवूड हॉटेल या १ किमी अंतरादरम्यान रस्त्यावर ऑईल गळती झाली होती. त्यामुळे पूर्ण ऑइल रस्त्यावर पसरले होते. या ऑइल गळतीमुळे येणारी वाहने घसरून अपघात होऊ लागले होते. थेरगावमधील तरुणांच्या तत्परतेमुळे अनेक अपघात टळले.


ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून या ठिकाणी अपघात झाले. अनेकांना शारीरिक दुखापत झाली. या वेळी स्थानिक नागरिक सुहास शिगवण व रुपेश पाटसकर यांनी ही घटना पाहिली व थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांना कळविली. ही गोष्ट सदस्यांना समजली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. त्यामुळे कसलाही विलंब न करता अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आॅइल सांडलेल्या ठिकाणी पाणी मारून रस्ता साफ केला.


घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी थेरगाव फाउंडेशनचे सदस्य राहुल सरवदे, अंकुश कुदळे, प्रशांत चव्हाण, अशोक धुमाळ, सचिन झरेकर, शेखर गांगर्डे व वाहतूक पोलीस यांनी सहकार्य केले.
डांगे चौक हा शहरातील मोठा मार्ग असल्यामुळे या ठिकाणी दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ चालू असते. अग्निशामक दलाने वेळेत येऊन सांडलेले आॅइल साफ केल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. तत्काळ सहकार्य केल्याबद्दल थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


आॅईल सांडले असल्याने दुचाकीचालकांना कसरत करावी लागत होती. ही बाब लक्षात घेत तरुणांनी अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. तसेच रस्त्यावर पाणी मारून रस्ता स्वच्छ करण्यात आला. त्याबद्दल वाहनचालकांनी संबंधित तरुणांचे आभार मानले.

Web Title: Accident due to a two-wheel collapse due to oil spill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.