नियमांकडे दुर्लक्ष केल्यानेच अपघात

By admin | Published: September 27, 2016 04:32 AM2016-09-27T04:32:00+5:302016-09-27T04:32:00+5:30

जलद वाहतुकीसाठी निगडी ते दापोडी ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. मात्र, नियमांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तसेच मार्गावर वारंवार केले जाणारे बदल यांमुळे ग्रेड सेपरेटरमधील अपघातांमध्ये

Accident without ignoring rules | नियमांकडे दुर्लक्ष केल्यानेच अपघात

नियमांकडे दुर्लक्ष केल्यानेच अपघात

Next

पिंपरी : जलद वाहतुकीसाठी निगडी ते दापोडी ग्रेड सेपरेटर उभारण्यात आला. मात्र, नियमांकडे केले जाणारे दुर्लक्ष, तसेच मार्गावर वारंवार केले जाणारे बदल यांमुळे ग्रेड सेपरेटरमधील अपघातांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडी काही अंशी टळली, पण अपघाताचा महामेरू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश केल्यानंतर पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करायला लागू नये. विनासिग्नल जलद प्रवास व्हावा, यासाठी निगडी ते दापोडी हा साडेबारा किलोमीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर २००८मध्ये बांधण्यात आला.
यामुळे निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून शहरात प्रवेश केल्यानंतर थेट पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग फायदेशीर ठरत आहे. अवघ्या बारा ते पंधरा मिनिटांतच निगडीहून दापोडीला पोहोचता येते. यामध्ये वाहनांचा वेगही अधिक असतो. मात्र, विविध ठिकाणी पडलेले खड्डे, ठिकठिकाणी सांडणारे आॅइल, उखडलेला रस्ता यांमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटते. दरम्यान, अचानक ब्रेक दाबल्यास वेगातील मागील वाहने एकमेकांवर धडकण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. तांत्रिक दोषांसह मानवी दोषांमुळे हा मार्ग धोकादायक बनू लागला आहे. वाहनांची वेगमर्यादा पाळली जात नसून, भरधाव वेगात वाहने धावत असतात. यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये भरच पडत आहे. पुण्याकडून निगडीच्या दिशेने येताना दापोडी येथील हॅरिस ब्रीज संपल्यानंतर लगेचच ग्रेड सेपरेटरला सुरुवात होते. मात्र, या ठिकाणी कसलेही सूचनाफलक लावण्यात आले नाहीत. (प्रतिनिधी)

ग्रेड सेपरेटरमधील मर्ज इन, मर्ज आऊटचे बदल वाहतूक विभागाकडून मिळालेल्या सूचना, तसेच त्यांच्या सल्ल्यानुसार केले जातात. ग्रेड सेपरेटरमधील खड्डे व इतर दुरुस्तीची कामे १५ आॅक्टोबरनंतर हाती घेतली जाणार आहेत. या मार्गिकेवर वेळोवेळी केले जात असलेले बदल, तसेच इतरही सूचनांचे फलक लावले जातात. ग्रेड सेपरेटरमधील देखभाल-दुरुस्तीच्या खर्चापेक्षाही अपघाताच्या घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीवर वर्षाला अधिक खर्च होतो. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघाताच्या घटना कमी होण्यास मदत होईल. -विजय भोजने, प्रवक्ता तथा उपअभियंता

Web Title: Accident without ignoring rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.