चिंचवडला कामगाराचा अपघाती मृत्यू
By admin | Published: May 10, 2017 04:00 AM2017-05-10T04:00:35+5:302017-05-10T04:00:35+5:30
चिंचवड एमआयडीसीतील कंपनीत काम करताना जॉब अंगावर पडून रोहन मुकुंद बालवडकर (वय ३०, रा. निगडी, प्राधिकरण) याचा मृत्यू झाला.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : चिंचवड एमआयडीसीतील कंपनीत काम करताना जॉब अंगावर पडून रोहन मुकुंद बालवडकर (वय ३०, रा. निगडी, प्राधिकरण) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
कंपनीत काम करताना सुरक्षा साधने पुरविली जात नाहीत. त्यामुळे दुर्घटना घडू लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पिंपरी एमआयडीसीत मोरवाडी येथील एका कंपनीत अशीच घटना घडली होती.
अशाच प्रकारची घटना चिंचवड एमआयडीसीतील कंपनीत घडली आहे. कंपनीत, तसेच ज्या रुग्णालयात कामगारावर उपचार झाले. त्या रुग्णालयातून माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांकडून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.