सेवारस्त्यावर खड्डेच खड्डे!, दुचाकीस्वार घसरून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:44 AM2018-07-09T01:44:40+5:302018-07-09T01:45:05+5:30

जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.

Accidents increase by two-wheeler collapse | सेवारस्त्यावर खड्डेच खड्डे!, दुचाकीस्वार घसरून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले

सेवारस्त्यावर खड्डेच खड्डे!, दुचाकीस्वार घसरून होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले

Next

कामशेत - जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर पवनानगर फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी काही अंतरावर मार्ग बंद करून मुख्य मार्गावरील वाहने सेवारस्त्याने वळवण्यात आली आहेत. सेवारस्त्याचे काम पूर्ण करण्याआधीच मार्ग वळवण्यात आल्याने वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यात सेवारस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व खडीचे साम्राज्य पसरल्याने महामार्गावरील वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनपेक्षितपणे पुढे आलेल्या खड्डयात वाहने आदळत आहेत. तर खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांना आमंत्रण मिळत आहे. तर स्थानिकांना सेवारस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
मागील सतरा ते अठरा महिन्यांपासून सुरू असलेल्या महामार्गावर पवनानगर फाटा येथील उड्डाणपुलाचे काम मे महिन्यात मुदत संपूनही पन्नास टक्के ही पूर्ण झाले नाही. येथे पवनानगरकडून कामशेतमध्ये येणारे जाणारे नागरिक महामार्ग ओलांडताना अपघातात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले. तर अनेकांना अपंगत्व आले. महामार्ग ओलांडणे नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी अनेकदा रस्ता रोको व विविध आंदोलने झाली. त्यातूनच मागील वर्षी जानेवारी महिन्यात येथे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. या वेळी स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील सर्व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून दीड महिना उलटला तरी पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने शिवाय सेवारस्त्यावर पडलेले खड्डे व पसरलेली खडी, सेवारस्त्यावर व कडेला झालेला चिखल, गटारीसाठी खोदलेले मोठे खड्डे आदी व इतर अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. एक वेळ महामार्ग ओलांडणे परवडत होते; पण या सेवारस्त्यावरून चालणे जीवघेणे झाले आहे. लहान लहान चिमुकल्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाºया महिला व पालकयांच्यात मोठी भीती निर्माणझाली आहे. त्यामुळेच नको आम्हाला तुमचा उड्डाणपूल आमचा जुना रस्ताच आम्हाला परत द्या, अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागले आहेत.

वाहतूककोंडीची समस्या गंभीर
१कामशेतमधील या उड्डाणपुलाच्या कामी नागरिकांची मोठी परवड होत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यात सेवारस्त्याच्या कडेला गटारीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमध्ये काही दुचाकीस्वार पडून अपघात झाले आहेत. शिवाय मार्गावरून जाणारी अवजड वाहने व इतर वाहनांचा अखंड प्रवास सुरू असून, त्यांनाही येथून प्रवास करणे जिकरीचे जाले आहे. यातूनच महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. दोन्ही लेनवर आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत.

उड्डाणपुलाच्या कामात दिरंगाई
२ अनेक माहीतगार वाहनचालक कामशेतमधील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करत असल्याने शहरातील वाहतुकीवर परिणाम होत आहे. या उड्डाणपुलाचे काम आणखी किती वर्षे सुरू राहणार आहे. स्थानिक नागरिकांसह पवनानगर भागातील नागरिक व महामार्गावरील वाहनचालक यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. त्यामुळेच येत्या
काही दिवसांत उड्डाणपुलाच्या कामामध्ये
झालेली दिरंगाई, नागरिकांची गैरसोय तसेच मोठ्या प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात राजकीय पक्ष आंदोलन करण्यात येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Web Title: Accidents increase by two-wheeler collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.