म्हमाणे, शेजल, धुमाळ आघाडीवर , वयोगट बुद्धिबळ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 02:13 AM2017-12-10T02:13:48+5:302017-12-10T02:14:00+5:30
रोटरी क्लब आॅफ चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात तिस-या फेरी अखेर सौरभ म्हमाणे, साहिल शेजल, अमित धुमाळ हे तिघे प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : रोटरी क्लब आॅफ चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड महानगर बुद्धिबळ संघटना आयोजित वयोगट बुद्धिबळ स्पर्धेत १५ वर्षांखालील गटात तिस-या फेरी अखेर सौरभ म्हमाणे, साहिल शेजल, अमित धुमाळ हे तिघे प्रत्येकी तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयातील मनोहर वाढोकार सभागृहात या स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. स्पर्धेतील सर्वांत लहान सहभागी खेळाडू विभोर गर्ग (३ वर्षे ८ महिने) याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. उद्घाटन रोटरी क्लबच्या अध्यक्षा अनघा रत्नपारखी आणि सचिव भूपिंदरसिंग जग्गी यांच्या हस्ते पटावर चाल करून करण्यात आले.
रोटरीचे पदाधिकारी गणेश कुदळे, अरविंद गोडसे, शुभदा गोडसे, शिरीष भोपे, बुद्धिबळ संघटनेचे विकास देशपांडे, सदाशिव गोडसे उपस्थित होते. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष विवेक भागवत यांनी केले. आभार मिलिंद पाध्ये यांनी मानले. सूत्रसंचालन मनीषा भागवत यांनी केले.
तिस-या फेरीचे काही निकाल : १५ वर्षाखालील : सौरभ म्हमाणे (३) वि.वि. अंशुल बसवंती (२), अमित धुमाळ (३) वि.वि. सुदर्शन अय्यर (२). वेद मोने (२) पराभूत वि. साहिल सेजल (३). कुशल बंसल (२) पराभूत वि. यश शाळीग्राम (३), ओम चोरडिया (२) वि.वि. शुभम जाधवर, पीयुष शिंदे (१) पराभूत वि. मानस शहा (२).
१३ वर्षाखालील : अथर्व गावडे (३) वि. वि. अर्जुन बोत्रे (२)
सर्वेश सावंत (३) वि. वि. स्वराज देव (२), निमिष देशपांडे (२) पराभूत वि. अमोघ कुलकर्णी (३), तन्मय चौधरी (३) वि. वि. यश गोवेकर (२), इशान येवले (३) वि.वि. आदित्य जोशी (२), तीर्थ शेवाळे (३) वि. वि. अथर्व पाटील (२), समर्थ गोसावी (२) पराभूत वि. श्रावणी अंबावाले (३), दर्शन मुटगी (३) वि. वि. सोहम भोईर (२). पतिक बिक्कड (३) वि.वि. पुष्कराज साळुंके (२), अथर्व शिंदे (१.५) बरोबरी वि. अर्चित वेलणकर (२.५)
११ वर्षाखालील : शिवराज पिंगळे (३) वि. वि. निधिश हर्णे (२), आदित्य प्रभू (३) वि. वि. वेदांत मिरासदार (२), यश आगरवाल (३) वि.वि. सिद्धी पालकर (२), शौर्य हिर्लेकर (३) वि. वि. आश्रिश आगवणे (२), राजन विनोथ (२) पराभूत वि. प्रणव भागवत (३), आर्यन गरांडे (२.५) बरोबरी वि. ओम शिंदे (२.५).
९ वर्षाखालील : अमोघ हिरवे (३) वि. वि. आदित्य गावंडे (२), सृजल भुते (३) वि. वि. आदित्य निफाडकर (२), आर्यन सिंगला (३) वि. वि. गीतिका राजीव (२), स्वानंद सप्रे (२) पराभूत वि. आर्यन पाटेकर (३), सम्याग शांद (२) पराभूत
वि. आयन आत्माकुरे (३),
अवनीश देशपांडे (३) वि. वि.
रुद्रा शिंदे (२), अनय उपलेंचवार (३) वि. वि. देवांश इनानी (२), ईशान वरुडकर (२) पराभूत वि. शंतनू गायकवाड (३), दिव्या अब्दागिरे (१.५) पराभूत वि. आयुषी मित्तल (२.५). निखिल चितळे (२.५) वि. वि. वेदांग चढ्ढा (१)
७ वर्षाखालील : दु्रपद पटारी (२) पराभूत वि. विराज अग्निहोत्री (३), आरुष डोळस (२) पराभूत वि. आरुष निलंगे (३), सोहम पाटील (२) पराभूत वि. विश्वजित जाधव (३)., कार्तिक जगताप (२) पराभूत वि. अवनीश फलके (३), हितांश जैन (३) वि.वि. आर्यन राव (२)
नऊ स्पर्धकांची आघाडी
१३ वर्षाखालील गटात अथर्व गावडे, सर्वेश सावंत, अमोघ कुलकर्णी, तन्मय चौधरी आदी ९ स्पर्धक प्रत्येकी तीन गुणासह संयुक्त आघाडीवर आहेत. ११ वर्षाखालील गटात शिवराज पिंगळे, आदित्य प्रभू, यश आग्रवाल आदी पाच जणांनी आघाडी घेतली आहे. ९ वर्षाखालील गटात अमोघ हिरवे, सृजल भुते, आर्य सिंगला आदी ८ स्पर्धक प्रत्येकी तीन गुणांसह आघाडीवर आहेत. ७ वर्षाखालील गटात विराज अग्निहोत्री, आरुष निलंगे, विश्वजित जाधव आदी ८ स्पर्धक प्रत्येकी तीन गुणांसह आघाडीवर आहेत.