पोलिसांच्या हातावर तुरी देऊ पळालेल्या आरोपीला नाशिकमधून अटक
By admin | Published: April 15, 2017 09:15 PM2017-04-15T21:15:18+5:302017-04-15T21:15:18+5:30
टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगिराज शिवराज खंडागळे याचा टोळक्याने खून केला. या प्रकरणातील सात आरोपींना ३ एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली होती.
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी चिंचवड, दि. 15 - टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने योगिराज शिवराज खंडागळे याचा टोळक्याने खून केला. या प्रकरणातील सात आरोपींना ३ एप्रिलला खडकी पोलिसांनी गुलबर्गा, कर्नाटक येथून अटक केली होती. न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिल होती. कोठडीची मुदत संपण्याच्या एक दिवस पूर्वी दोन आरोपींनी खिडकीचे गज वाकवून, कोठडीतून पलायन केले होते. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले. प्रमुख आरोपी सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय ४०,रा. खडकी याला नाशिक मालेगाव येथून दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले.
खडकी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केलेल्या आरोपींमध्ये सिराज अल्लाद्दीन अमीर कुरेशी (वय ४०,रा. खडकी) व सनी विजय अॅन्डी (वय २५, धानोरी विश्रांतवाडी) या दोन आरोपींचा समावेश होता. त्यातील सनी १२ एप्रिललाच पोलिसांच्या हाती लागला. दुसरा आरोपी कुरेशी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिकला आरोपीच्या मागावर पथके पाठवली होती.
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक साकोरे,पीलीस उपआयुक्त पी आर पाटील, सुरेश भोसले यांच्या माग्दर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकातील सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, पोलस कर्मचारी यशवंत आंब्रे, संजय दळवी, नीलेश पाटील,संतोष पवार यांच्या पथकाने प्रमुख आरोपीला नाशिक येथून अटक केली आहे. या प्रकरणी 2 पोलीस कर्मचारी,एक पोलीस निरीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई यपूर्वीच केली आहे.