तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 13:08 IST2018-05-29T13:08:06+5:302018-05-29T13:08:06+5:30
गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणीच्या घरासमोर जात असताना तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन तिची छेड काढत असे.

तरूणीची छेडछाड काढणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी :पाठलाग करुन अश्लील हावभाव करुन तरुणीची छेडछाड करणाऱ्या दोन तरुणांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित तरुणीने दोघांविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून सुर्यभान मुक्तार शेख (वय २३, रा. मोशी) आणि त्याचा साथीदार कृष्णा धोत्रे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोपी तरुणीच्या घरासमोर जात असताना तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करुन तिची छेड काढत असे. त्याचबरोबर वारंवार तिचा पाठलाग करुन तिची छेड काढत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.