दोघांच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 01:16 AM2019-01-07T01:16:53+5:302019-01-07T01:16:57+5:30
येरवडा पोलिसांचा तपास : अपघात करणारी मोटार ताब्यात; तळेगाव दाभाडेतील तरुणीची तक्रार
पुणे : भरधाव मर्सिडीज मोटारीने दुचाकीला जोरदार धडक देऊन केलेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा मृत्यू झाला होता, तर त्यांच्यासोबत असणारी युवती गंभीर जखमी झाली होती. या अपघातातील आरोपी तन्मय चैतन्य ठाकूर (वय २७, सध्या रा. वडगावशेरी, मूळ रायपूर) याला येरवडा पोलिसांनी शुक्रवारी रात्री शिताफीने अटक केली. याप्रकरणी अपघातातील जखमी तरुणी शायनस कावन (वय २१, रा. तळेगाव दाभाडे) हिने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली होती. अटक आरोपीला प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी ए. एस. पानसरे यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.
मंगळवारी (दि. २५ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास हा गंभीर अपघात झाला. या अपघातात अॅरिक जोसेफ रॉड्रिक्स (वय २५, वडगावशेरी) व अमेय रविशेखर आखरे (२५, वाघोली) या दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर शायनस कावन (वय २१, रा. तळेगाव दाभाडे) ही तरुणी गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, हणमंत जाधव, अजिज बेग, नवनाथ वाळके, अशोक गवळी, अजय पडोळे, सुनील नागलोत, समीर भोरडे, किशोर सांगळे यांच्या पथकाने केला. ब्रह्मासनसिटी वडगावशेरी आदर्शनगरकडून डिओ दुचाकीवरून अँरिक, अमेय व शायनस असे तिघे कल्याणीनगरकडे चालले होते. समोरून वेगात आलेल्या लाल रंगाच्या मोटारीने दिलेल्या जोरदार धडकेत तिघेही जखमी झाले.
भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या २० घरमालकांवर गुन्हा
चाकण : आपल्या घरात राहणाºया भाडेकरूंची माहिती चाकण पोलीस ठाण्यात न देता शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चाकण परिसरातील २० घरमालकांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. एकनाथ तबाजी शेळके (रा. जाधववाडी, चिखली), कमलेश ज्ञानेश्वर भोसले (रा. महाळुंगे इंगळे), बाळासाहेब सोपान येळवंडे (रा. निघोजे), संदीप अमृता खराबी (रा. खराबवाडी ), विशाल गेनभाऊ कांडगे (रा. चाकण), सचिन जगन्नाथ क्षीरसागर (रा. चाकण), संदीप जगन्नाथ क्षीरसागर (रा. चाकण), श्रीराम रामसहाय विश्वकर्मा (रा. चाकण), पप्पू बद्रिप्रसाद बघेल (रा. चाकण), तुषार बाळासाहेब खराबी (रा. खराबवाडी), संतोष बबन नाणेकर रा. नाणेकरवाडी), रामचंद्र भारू भोर (रा.अवसरी खुर्द), अतुल बाळासाहेब गोरे (रा. मेदनकरवाडी), रुपेश शांताराम जाधव (रा. नाणेकरवाडी ), संदीप बाबूराव जाधव (रा. नाणेकरवाडी), नितीन गोरख घोजगे (रा. पुणे), सुदाम लक्ष्मण घोजगे (रा. जांबवडे, सुदुंबरे, ता. मावळ ), कैलास राघू बवले (रा. महाळुंगे इंगळे), निवृत्ती बाबूराव सरोदे (रा. सुखवानी पार्क, ग्रीन फिल्डजवळ, पिंपरी, पुणे), भीमा बबन पायगुडे (रा. महाळुंगे इंगळे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भाडेकरूंची नावे आहेत.