११२ वाहनांवर कारवाई
By admin | Published: December 2, 2014 06:02 AM2014-12-02T06:02:07+5:302014-12-02T06:02:07+5:30
काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईची जोरदार मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली. सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली
पिंपरी : काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईची जोरदार मोहीम वाहतूक विभागाने हाती घेतली. सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. निगडी, भोसरी, पिंपरी या विभागात दिवसभरात १२२ वाहनांवर कारवाई करण्यात आली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांच्या काचा काळ्या नसाव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सोमवारपासून कारवाईची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. भोसरी वाहतूक विभागाने दिवसभरात २७ वाहनांवर कारवाई केली. नाशिक फाटा, सीआयआरटी समोर, भोसरी चौक आदी ठिकाणी कारवाई केली.
पिंपरी विभागाने २४ वाहनांवर कारवाई करीत २ हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला. पिंपरी चौक, मोरवाडी चौक, केएसबी चौक, पिंपरी कॅम्प आदी परिसरात कारवाई केली जात होती. निगडी विभागाने दिवसभरात ७१ वाहनांवर कारवाई केली. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. भक्तिशक्ती चौक, लोकमान्य टिळक चौक, आकुर्डी रेल्वेस्थानक, प्राधिकरण, ट्रान्सपोर्टनगर येथे ही कारवाई केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथे तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाला. ज्या वाहनामध्ये ही घटना घडली, त्या वाहनाच्या सर्व काचा काळ्या होत्या. तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनात गैरप्रकार घडत असल्याची बाब अनेकदा समोर आली आहेत. या अनुषंगाने सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)