PCMC : दिवाळीची भेट स्वीकाराल तर कारवाई; महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 09:14 AM2022-10-14T09:14:45+5:302022-10-14T09:16:30+5:30

शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे..

action if Diwali gift accepted; Municipal commissioner's warning to employees | PCMC : दिवाळीची भेट स्वीकाराल तर कारवाई; महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा

PCMC : दिवाळीची भेट स्वीकाराल तर कारवाई; महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना इशारा

googlenewsNext

पिंपरी : दिवाळी सणानिमित्त ठेकेदारांसह पदाधिकारी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देतात. परंतु, महापालिकेत अशा प्रकारे भेटवस्तू वाटपास मनाई केली आहे. तसेच, जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

आयुक्त सिंह यांनी भेटवस्तू स्वीकारणेच्या प्रथेला चाप बसविण्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचा आधार घेत गुरुवारी (दि. १३) एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील कलम १२ नुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतीही देणगी (भेटवस्तू) स्वतः स्वीकारता कामा नये अथवा त्याच्या कोणत्याही कुटुंबीयाला किंवा त्याच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये, असे आयुक्तांनी म्हटले आहे.

या संदर्भात सुरक्षा विभागाने अशा भेटवस्तू घेऊन येणाऱ्यास कार्यालयात मज्जाव करावा, अशा प्रकारच्या भेटवस्तू महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कडक कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी नमूद केले आहे.

Web Title: action if Diwali gift accepted; Municipal commissioner's warning to employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.