अवैध गौणखनिज उत्खननावर कारवाई
By admin | Published: November 16, 2016 02:41 AM2016-11-16T02:41:46+5:302016-11-16T02:41:46+5:30
शहरातील अवैधरीत्या गौण खनिज उत्खननावर बंदी असताना अनधिकृ तरीत्या उत्खनन केल्यामुळे श्री साई प्रसाद ट्रेडर्सचे मारुती एकनाथ शिंदे
पिंपरी : शहरातील अवैधरीत्या गौण खनिज उत्खननावर बंदी असताना अनधिकृ तरीत्या उत्खनन केल्यामुळे श्री साई प्रसाद ट्रेडर्सचे मारुती एकनाथ शिंदे यांना पिंपरी-चिंचवडचे (हवेली)अपर तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सुमारे २६ लाख ६६ हजार रुपयांचा दंड केला आहे़ मुरुम, माती , वाळू, दगड, डबर, खडी हे गौणखनिजात येते़ शिंदे याने शासनाची पूर्वपरवानगी न घेता, तसेच रॉयल्टी न भरता वाळू या गौणखनिजाचे बेकायदारीत्या उत्खनन केले़ तसेच वाळूचा साठा केला़ त्यामुळे कारवाई करण्यात आल्याची माहिती बेडसे यांनी दिली़
शहरातील क्रशरमालकांच्या एक सप्टेंबरला आयोजित बैठकीत कर भरल्यास कारवाई करण्याची नोटीस तहसीलदारांनी दिली होती़ इशारा देऊनही गौणखनिजांचे उत्खनन सुरू होते़ त्यामुळे कारवाई सुरू करण्यात आली आहे़ शासनाच्या नियमांप्रमाणे उत्खनन करण्यापूर्वी डबर, मुरुम, वाळू, माती यांची रॉयल्टी भरणे बंधनकारक आहे़ परंतु अनेकांकडून या नियमाची पायमल्ली केल्यामुळे सर्वाकडून वसुली सुरू करण्यात आल्याची माहिती बेडसे यांनी दिली़ (प्रतिनिधी)