बेकायदेशीर व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई; पोलिसांनी जप्त केल्या इलेक्ट्रॉनिक्स मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 06:12 PM2021-03-23T18:12:58+5:302021-03-23T18:13:20+5:30
४८ हजार ८२० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स मशीन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.
पिंपरी : बेकायदेशीर व्हिडीओ गेम सेंटरवर पोलिसांनी कारवाई करून एकाला ताब्यात घेतले. यात ४८ हजार ८२० रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स मशीन व रोख रक्कम, असा मुद्देमाल जप्त केला. माणगाव (ता. मुळशी) शनिवारी (दि. २०) ही कारवाई केली.
तिम्मप्पा नारायण गानेगा (वय ३५, रा. माणगाव, ता. मुळशी), असे आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा माणगाव येथे बेकायदेशीर व्हिडिओ गेम सेंटर चालवीत आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या व्हिडिओ पार्लरवर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच व्हिडिओ गेम खेळणारे इसम पळून गेले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे व्हिडिओ पार्लर चालवण्याचा परवान्याबाबत चौकशी केली. मात्र त्याच्याकडून योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन ४८ हजार ८२० रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स मशीन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला. आरोपीच्या विरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड उपनिरीक्षक यशवंत साळुंके, पोलीस कर्मचारी नितीन पराळे, रवी पवार, आकाश पांढरे, अली शेख, होमगार्ड अक्षय भोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.