महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृतावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 01:31 AM2018-10-26T01:31:45+5:302018-10-26T01:31:48+5:30

वृत्तपत्रातील जाहिरातीत दिलेले मोबाइल क्रमांक घेऊन त्या महिलांना मोबाइलवर संपर्क साधून अश्लील संभाषण करणाºया विकृतावर वाकड पोलिसांनी कडक कारवाई केली.

Action on the perpetrators of pornographic conversation with women | महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृतावर कारवाई

महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या विकृतावर कारवाई

Next

पिंपरी : वृत्तपत्रातील जाहिरातीत दिलेले मोबाइल क्रमांक घेऊन त्या महिलांना मोबाइलवर संपर्क साधून अश्लील संभाषण करणाºया विकृतावर वाकड पोलिसांनी कडक कारवाई केली. प्रशांत शंकर मोरे (वय ३०, रा. डेक्कन जिमखाना, पुणे) असे विकृताचे नाव आहे. महिलांनी तक्रार दिल्यानंतर वाकड पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्याला पोलीस ठाण्यात आणले. आणखी काही महिलांच्या तक्रारी असतील, तर माहिती घेऊन कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी दिली.
दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार भोसरीतील महिलांच्या बाबतीत घडला. त्यानंतर महिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. काही दिवसांत हा प्रकार बंद झाला होता. १० आॅक्टोबरला वाकड परिसरातील दोन महिलांना अशाच प्रकारे विकृताचे फोन येऊ लागले. त्यामुळे वाकड पोलिसांकडे या प्रकरणी महिलांनी फिर्याद दाखल केली. वाकड पोलिसांनी या प्रकरणी शोध मोहीम सुरू केली.
मोबाइल खडकीतील एका बेकरीवाल्याचा असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले. खडकीतील बेकरीवाल्याला ताब्यात घेतले असता, त्याने मोबाइल चोरीस गेला असल्याचे सांगितले. चोरलेला मोबाइल कोणाकडे आहे. महिलांना संपर्क साधण्यासाठी वापरात येणाºया मोबाइलवरून कोणाशी संपर्क होत आहे, यावर वाकड पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजन तसेच तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक हरेश माने यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणेला वेग दिला. त्यांना या तपासकामी मोहन जाधव, प्रमोद भांडवलकर, नितीन गेंगजे, श्याम बाबा यांनी सहकार्य केले.
>मनोविकृतपणाचा कळस
कल्याण येथील तो रहिवासी असून, कायम भटकत असतो, असे त्याच्या सासºयाने सांगितले. मनोविकृत असून त्याच्याबद्दल अनेक तक्रारी येतात, असेही त्यांनी नमूद केले. ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी मोबाइल चोरून त्याचा गैरवापर करण्याची त्याची मोडस आॅपरेंडी आहे. पुण्यात खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाडीवर काम करीत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सखोल चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Action on the perpetrators of pornographic conversation with women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.