अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By Admin | Published: May 11, 2017 04:37 AM2017-05-11T04:37:21+5:302017-05-11T04:37:21+5:30
पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभाग ‘ड’ व ‘क ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ५९ व ६० सांगवी
लोकमत न्यूज नेटवर्क
रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभाग ‘ड’ व ‘क ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ५९ व ६० सांगवी येथील मधुबन सोसायटी, हिरकणी सोसायटी, शिंदेनगर व मुळानगर परिसरात नवीन सुरु असलेल्या आरसीसी व वीट बांधकाम अशा अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण १४५०० चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
शहरात अनधिकृत बांधकाम होऊ नये म्हणून प्रत्येक प्रभागात बीट निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मग ही बांधकामे झाली कशी? जर बीट निरीक्षकांनी अशा अनधिकृत बांधकामांची नोंद केली, तर सर्वच अनधिकृत बांधकामांची नोंद केली काय? जर केली असेल, तर सरसकट कारवाई होताना का दिसून येत नाही, असा सवाल अनेक मिळकतधारक करीत आहेत. निवडणूक काळात शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली; मात्र कारवाई होताना दिसून येत नाही. अनधिकृत बांधकामावरील कारवाई काही ठरावीक भागातच होत आहे. त्यामुळे शहरवासीय पालिका प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत आहेत. ही कारवाई कार्यकारी अभियंता बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ड व क यांच्या पथकाने केली. या वेळी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी, १५ मजूर, १५ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या साह्याने ही कारवाई करण्यात आली.