अनधिकृत बांधकामांवर कारवाई
By admin | Published: March 25, 2017 03:48 AM2017-03-25T03:48:08+5:302017-03-25T03:48:08+5:30
महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४६ पवनानगर
रहाटणी : महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाच्या वतीने ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४६ पवनानगर, काळेवाडी येथील सलग दोन दिवस कारवाई करून ३७ नवीन सुरू असलेल्या आरसीसी व वीट बांधकामावर, तसेच पत्राशेड, पूररेषेतील, हरित पट्ट्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण ३५ हजार ६०० चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
विजयनगर येथील पूररेषेतील ५५०० चौरस फुटांचे एका कार्यालयाचे शेड व १२०० चौरस फुटांचे वीट बांधकाम पाडण्यात आले. तसेच पवनानगर गल्ली क्रमांक एकमधील हरितपट्ट्यातील नवीन सुरू असलेले आरसीसी बांधकाम व वीट बांधकाम अशी ५००० चौरस फुटांची सात बांधकामे जमीनदोस्त झाले.
अल्फान्सो शाळा परिसरातील निवासी क्षेत्रातील ७००० चौरस फुटांची सहा बांधकामे पाडण्यात आली. पवनानगर गल्ली क्रमांक १, २ व ३ मधील हरित पट्ट्यातील १६९०० चौरस फुटांचे २२ आरसीसी अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. (वार्ताहर)
दर्जाहीन कामे
४महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात बांधकामाचा सपाटा लावला होता. फक्त घर बांधायचे म्हणून बांधायचे अशी परिस्थिती होती. कोणत्याही प्रकारचा दर्जा नसलेली कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत व झाली आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एखादा अपघातही होऊ शकतो. ऐन निवडणुकीच्या काळात पाडापाडीची मोहीम पालिकेने हाती घेतली नव्हती. त्यामुळे पालिका काही करणार नाही, या समजाने नागरिकांनी संधीचा फायदा उठवीत अनेकांनी बांधकामे करून घेतली.
अधिकाऱ्यांचा चंग
४मात्र निवडणुकीचे वारे शांत होताच अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचा पालिकेच्या संबंधित विभागाने चंगच बांधल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सध्या क्षेत्रीय कार्यालय अ,ब,क व ड याच परिसरात कारवाईचा जोर दिसून येत आहे. इतर भागात कारवाई दिसत नाही.