पिंपरीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी फेकल्या चपला, बांगड्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 08:28 PM2022-03-06T20:28:42+5:302022-03-06T20:30:13+5:30

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकत्र्यांनी चपला आणि बांगड्या फेकत भाजप कारभाराचा निषेध केला

Activists throw slippers, bangles at Devendra Fadnavis's convoy in Pimpri ... | पिंपरीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी फेकल्या चपला, बांगड्या...

पिंपरीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी फेकल्या चपला, बांगड्या...

Next

पिंपरी : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चपला आणि बांगड्या फेकत भाजप कारभाराचा निषेध केला. ‘‘जनता आपले काम बघत आहे. कुणी काळे, पिवळे, निळे कोणतेही झेंडे घेतले तरी काही फरक पडत नाही. त्यांची दुकाने बंद झाली आहेत हे खरे आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी राष्ट्रवादी कार्यकत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांच्या वाहनांवर चपला फेकल्या. महिलांनी बांगड्या भिरकाविल्या. 

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘जनता आपले काम बघत आहे. कुणी काळे, पिवळे, निळे कोणतेही झेंडे घेतले तरी काही फरक पडत नाही. त्यांची दुकाने बंद झाली आहेत हे खरे आहे. महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर झालेला विकास लोकांनी बघितला आहे. एखादे चांगले काम करा आणि श्रेय घ्या. पण विरोधकांना काम करायचंच नाही आणि श्रेय घ्यायचं आहे.

ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो. आम्ही पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले आहे. आता वॉर्डबदल करा अगर वाटेल ते करा, जनता बघत आहे, अनुभव घेत आहे.’’

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘आपली जुणी माणसं म्हणतात, ओरतात ते चावत नसत. बाप दाखव नाही तर... अशी जुणी म्हण आहे. आता जनता काम दाखव नाही तरच मत मागायला या, अशी म्हणते. त्यामुळे  केवळ आरोप करण्यापलिकडे विरोधक काहीही करू शकत नाही.’’

Web Title: Activists throw slippers, bangles at Devendra Fadnavis's convoy in Pimpri ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.