मतदारयादीला आधार कार्डचा नंबर जोडावा
By admin | Published: March 27, 2017 02:51 AM2017-03-27T02:51:46+5:302017-03-27T02:51:46+5:30
भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार
पिंपरी : भारत हा लोकशाहीप्रधान देश असून, देशातील प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. आज बहुतांशी व्यवहार हे आधार कार्ड या ओळखपत्राला प्रमाण मानून केले जात आहेत. म्हणूनच मतदारयादी व आधार
कार्ड नंबर यांना एकत्रित करून देशातील निवडणुकीची प्रक्रिया राबवली जावी, अशी मागणी आज लोकसभेच्या शून्य काळाच्या तासामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, की देशातील लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानीय स्वराज्य संस्था या प्रत्येक निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी केवळ ५० ते ६० टक्के मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत असतात. देशात मतदान न करणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. तर असेही काही मतदार आहेत जे व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या राज्यांत व जिल्ह्यांत जातात. त्यामुळे त्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारयादीत समाविष्ट झाली आहेत. (प्रतिनिधी)
प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार असताना प्रत्येकाचे नाव हे केवळ एकदाच मतदारयादीत असावे व त्या मतदाराने एकाच ठिकाणी मतदान केले पाहिजे. त्यामुळे बोगस मतदानावर अंकुश ठेवता येईल. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे नाव हे मतदारयादीत असलेच पाहिजे व प्रत्येक मतदाराचे नाव हे त्याच्या आधार नंबरने जोडले गेले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मतदाराचे नाव हे एकाच मतदारयादीत दिसेल व बोगस मतदानावर पूर्णत: नियंत्रण मिळवता येईल. ही यंत्रणा
केंद्र सरकारने लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी बारणे यांनी केली.