कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी अदितीचा ‘धाडसी’ निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 02:11 PM2018-09-26T14:11:59+5:302018-09-26T14:12:23+5:30

तिचं वय तसं फार नाही जेमतेम चौदा वर्ष..पण या लहान वयात तिने दाखवलेल्या संवेदनशीलतेला खरोखर सलाम केलाच पाहिजे.

Aditi's 'brave' decision for patients suffering from cancer | कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी अदितीचा ‘धाडसी’ निर्णय

कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी अदितीचा ‘धाडसी’ निर्णय

Next
ठळक मुद्देचिंचवड मधील तेरा वर्षीय चिमुरडीने केले केस दान

पराग कुंकुलोळ 
चिंचवड: काळेभोर लांब केस हे महिलांचं मुख्य आकर्षण.. पण हे केस कर्करोग ग्रस्तांना उपयोगी पडतात हे समजल्यावर तिने चक्कं आपले काळेभोर केस कापत त्याचे एका सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला दान करण्याचे धाडस दाखवले. तिचं वय तसं फार नाही तर जेमतेम चौदा वर्ष..पण या लहान वयात तिने दाखवलेल्या संवेदनशीलतेला खरोखर सलाम केलाच पाहिजे. या सामाजिक जाणिवे ओळख अधोरेखित करणाऱ्या मुलीचे नाव आहे अदिती जैन.
     चिंचवड मधील हे जैन कुटुंबिय जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवडच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. मृत्यूपश्चात अवयव दानाची मोहीम सध्या जैन सोशल ग्रुपकडून राबविण्यात येते.याच कार्यातून दानाची महती मिळालेल्या अदितीने मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या ‘मदत चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेला तिने स्वत:चे केस कापून दान केले आहेत. तिच्या या दानशूर वृत्तीचे सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे. 
पाचवीत शिक्षण घेणारी अदिती आपल्या आई-वडिलांसोबत एका कर्करोगग्रस्त महिला नातेवाईकांना भेटण्यासाठी गेली होती. तेव्हा उपचारा घेणाऱ्या महिलेला केस नसल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत तिने पालकांना विचारले असता अशा रुग्णांना या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे तिला कळाले. अशा महिलांना कोणी केस दान केले तर मुंबईमधील संस्था या केसांचे टोप बनवून कर्करोग महिलांना देत असल्याचे तिला समजले. तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता स्वत:चे केस या संस्थेला दान करण्याची इच्छा पालकांकडे व्यक्त केली. 
अदितीची आई अपर्णा जैन यांनी ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली .तिचे वडील जितेंद्र जैन यांनी मुलीच्या या निर्णयाचे स्वागत करत मुंबईतील 'मदत चॅरिटेबल ट्रस्ट' या संस्थेशी संपर्क साधत त्यांनी मुलीची इच्छा व्यक्त केली. अदितीने लागलीच आपले केस कापून त्या संस्थेकडे पाठविले.अदितीने दाखवेलल्या धाडसाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तसेच तिचे समाजातून कौतुक देखील होत आहे.
कर्करोगग्रस्त रुग्णांच्या उपचारा दरम्यान त्यांना केस गमविण्याची वेळ येते. त्यांना पुन्हा केस येत नाहीत अशा घटनेत त्यानां केसांचा टोप बसवावा लागतो. यासाठी काम करणाऱ्या संस्थेला समाजातून सहकार्य मिळणे आवश्यक असल्याचे जैन कुटुंबीय सांगत आहेत. मुलांमध्ये लहान वयातच सामाजिक कार्य करण्याचे विचार रुजवणे गरजेचे आहे. जैन सोशल ग्रुपच्या माध्यमातून नेत्रदान,अवयवदान,श्रमदान व  शैक्षणिक दानाचे कार्य केले जाते. 

Web Title: Aditi's 'brave' decision for patients suffering from cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.