निवडणूक कार्यालयात प्रशासकीय सज्जता

By admin | Published: January 27, 2017 06:01 PM2017-01-27T18:01:09+5:302017-01-27T18:01:09+5:30

निवडणूक कार्यालयात प्रशासकीय सज्जता

Administrative Preparedness in Election Office | निवडणूक कार्यालयात प्रशासकीय सज्जता

निवडणूक कार्यालयात प्रशासकीय सज्जता

Next

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्यास आज सुरूवात झाली. शहरातील ११ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात आॅनलाइन उमेदवारी अर्जांची माहिती घेणे, विविध कक्ष तयार करणे, मतमोजणीची यंत्रणा सज्ज करणे, सुरक्षेच्या उपाययोजना करणे आदी कामे सुरू असल्याचे दिसून आले. प्रशासकीय सज्जता आज दिसून आहे. 

महापालिकेचा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर प्रारूप मतदारयादी अंतिम केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली. शहरातील १२८ जागांसाठी ३२ प्रभाग आणि प्रत्येक तीन प्रभाग असे ११ निवडणूक निर्णय अधिकाºयांची कार्यालये तयार केली असून, पिंपरी-चिंचवड आणि भोसरी अशा तीन मतदारसंघात ही कार्यालये आठवडाभरापासून सुरू झाली आहेत. आजपासून प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली. 

आॅनलाइन अर्जासाठी हेल्प डेस्क

निवडणूक महिनाभरावर आली असून, त्यासाठी शुक्रवारपासून उमेदवारीअर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे. या वर्षी हे अर्ज प्रथमच आॅनलाइन पद्धतीने भरले जाणार आहेत. उमेदवारी अर्जासाठी प्रशासनाची सर्व तयारी झाली पूर्ण झाली आहे. शहरातील निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात एक हेल्प डेस्क तयार केला आहे. तिथे उमेदवारी अर्ज कसे भरायचे याबाबत माहिती दिली जात आहे. 

शुक्रवारपर्यंत भरता येणार अर्ज

राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार आठवडाभर अर्थात ३ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करण्यात येणार आहेत. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट काढून निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर करायची आहे. त्यानंतरच उमेदवारी अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.

रविवारीही भरता येणार उमेदवारीअर्ज 

उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी असलेल्या मुदतीत एक रविवार येत असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था झाली होती. उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी अर्ज भरण्याची सुविधा निवडणूक उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे रविवारीही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू असणार आहेत. त्यामुळे सुटीच्या दिवशीही उमेदवाराला त्याचा अर्ज भरता येणार आहे. 

उमेदवारी यादीची प्रतीक्षा 

 

Web Title: Administrative Preparedness in Election Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.