विद्यार्थ्यांची साहसी प्रात्यक्षिके, देहूरोड आयुध निर्माणी वसाहतीत सांस्कृतिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 03:25 AM2018-01-30T03:25:41+5:302018-01-30T03:26:08+5:30
देहूरोडसह पवन मावळातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
देहूरोड : देहूरोडसह पवन मावळातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
देहूरोड येथील आयुध निर्माणी वसाहतीत यंदा प्रथमच प्रजासत्ताक दिन खुल्या क्रीडा मैदानात आयोजित करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयुध निर्माणीतील पंचवीस वर्षे
सेवकाल पूर्ण केलेल्या तसेच विविध विभागांत उल्लेखनीय काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय विद्यालय व अंकुर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कला गुणांना वाव देण्यात आला. प्रशासनाने आठवडाभर जय्यत तयारी केल्याने कार्यक्रमाला सर्व थरातून मोठा प्रतिसाद मिळाला.
देहूरोड आयुध निर्माणीचे सरव्यवस्थापक संतोष कुमार सिन्हा यांच्या संकल्पनेतून प्रथमच प्रजासत्ताक दिन मैदानात साजरा करण्यात आला. ध्वजवंदन संतोषकुमार सिन्हा यांच्या हस्ते झाले. या वेळी आयुध निर्माणीतील संयुक्त महाप्रबंधक ललित खोब्रागडे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय तसेच केंद्रीय विद्यालय क्रमांक दोनमधील विद्यार्थी, अंकुर विद्यामंदिर येथील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पायरो क्रीडा मैदानात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात देशातील विविध राज्यांतील परंपरा, लोकनृत्य, लोकसंगीत सांस्कृतिक कार्यक्रम तसेच देशभक्तीवर आधारित गीते सादर केली. विद्यार्थ्यांनी संचलन व कवायत सादर केली. सिन्हा यांनी मनोगत व्यक्त करताना सुरक्षा आयुधांची व दारुगोळा व इतर विशेष उत्पादनाची माहिती दिली.
पवन मावळात विविध कार्यक्रम
शिरगाव : पवन मावळातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी प्रभात फेरी काढून भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला. जिल्हा परिषद शाळा शिरगाव, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सोमाटणे, विठ्ठलवाडी, परंदवडी, चंदनवाडी, बेबेडओहोळ, सांगवडे आदी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन साजरा झाला. कवायत, संचालन, लेझीम, बर्ची, झांझ आदींची प्रात्यक्षिके सादर केली.
शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळा आणि आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
या वेळी इरफान सय्यद, सपना लालचंदानी, उद्योजक तानाजी वाघोले, तृप्ती जांभूळकर, राजेश मांढरे, मोहन नवानी, माजी सरपंच उस्मान शेख, शेखर झिलपिलवार, मुख्याध्यापक विजय लोखंडे आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेत सरपंच मंगल गोपाळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका सुजाता खैरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़
भाजपाच्या वतीने मानवंदना
४कामशेत : भाजपाच्या वतीने कामशेतमधील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात ‘राष्ट्रीय तिरंगा यात्रा संमेलन’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या वेळी भाजपाचे शंकर शिंदे, वसंत काळे, विजय शिंदे, रोहिदास शिंदे, संजय लोणकर, गिरीश रावळ, सरपंच सारिका घोलप, सारिका शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी भारत मातेचा जयघोष करण्यात आला.
उल्लेखनीय काम करणाºयांचा सन्मान
४आयुध निर्माणीत गेली पंचवीस वर्षे काम करणाºया तसेच उल्लेखनीय काम करणाºया निर्माणीतील उत्पादन, गुणवत्ता, दर्जा, सुरक्षा, कर्मचारी, स्वच्छता व प्रशासन विभागातील कर्मचारी व अधिकारी वर्गाचा महाप्रबंधक संतोषकुमार सिन्हा यांच्या हस्ते गौरवचिन्ह, हातातील घड्याळ व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आयुध निर्माणी वसाहतीत राहणाºया कर्मचाºयांनी परिसर स्वच्छता राखण्यासाठी विशेष सन्मान करण्यात आला.
महिला अधिकाºयांच्या हस्ते ध्वजवंदनाची परंपरा
४आयुध निर्माणी वसाहतीतील महिला कल्याण समितीमार्फत चालविण्यात येणाºया अंकुर विद्यामंदिरच्या प्रागंणात अध्यक्षा अंजू सिन्हा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी महाप्रबंधक संतोषकुमार सिन्हा आदी अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना शब्दकोश
४बेबड-ओव्होळ येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच सुषमा गायकवाड, श्री ज्योतिबा हायस्कूलमध्ये उपसरपंच सुनीता घारे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळेत पोलीस पाटील दुर्गा घारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक पोपट हंडे, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील वर्षी दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना स्वर्गीय वामनराव घारे प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानित करून बक्षीस देण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शब्दकोश देण्यात आला.
विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजवंदन
४दारुंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलमध्ये ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला आगळे, ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच तुषार वाघोले, तर जिल्हा परिषद शाळेत सरपंच मनीषा वाघोले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक नारायण पवार, गौतम चव्हाण आदी उपस्थित होते. साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात बारावीची विद्यार्थिनी ऋतुजा टिळेकर हिच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी सरपंच उज्ज्वला आगळे, उपसरपंच दिलीप विधाटे, मुख्याध्यापक राजेंद्र लासूरकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी सादर केली प्रात्यक्षिके
४प्रज्ञाप्रबोधिनी इंग्लिश शाळेत मदन कापरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष यादवेंद्र जोशी, मुख्याध्यापिका सुमेधा खांबेटे आदी उपस्थित होते. हाय व्हिजन इंग्लिश मीडिअम शाळेत संस्थेचे अध्यक्ष माधवन कुट्टी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी खजिनदार राकेश कुट्टी, प्राचार्या मृदुला गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. विमल उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कराटे, स्केटिंग, योगा, आदींची प्रात्याक्षिके दाखविली.
माजी विद्यार्थ्यांकडून खाऊवाटप
४परंदवडी येथील बा़ नं़ राजहंस विद्यालयात माजी उपसरपंच भरत भोते यांच्या हस्ते ध्वजपूजन व माजी उपसरपंच दत्तात्रय पापळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी सरपंच मालन चव्हाण, उपसरपंच विजय भोते, मुख्याध्यापक विठ्ठल माळशिकारे आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी खाऊचे वाटप केले.