‘हमारा भाई जेल से छुट गया...' खून प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यावर रॅली, पिंपरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:24 AM2024-05-06T09:24:13+5:302024-05-06T09:24:25+5:30

हातात लाठ्या, काठ्या व कोयते घेऊन रॅली काढत दुचाकींचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून लोकांना दमदाटी केली

After coming out of jail in the case of murder a case was filed against the gang in Pimprit. | ‘हमारा भाई जेल से छुट गया...' खून प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यावर रॅली, पिंपरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

‘हमारा भाई जेल से छुट गया...' खून प्रकरणात जेलमधून बाहेर आल्यावर रॅली, पिंपरीत टोळक्यावर गुन्हा दाखल

पिंपरी : खून प्रकरणातील संशयित जेलमधून बाहेर आल्याने टोळक्याने दुचाकी रॅली काढली. ‘हमारा भाई जेल से छुट गया, अभी हम दुश्मन को देख लेंगे’, असे म्हणत १३ जणांनी हातात काठ्या आणि कोयते घेऊन दुचाकी रॅलीमधून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. चिंचवड येथील इंदिरानगमध्ये शुक्रवारी (दि. ३) रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

आकाश गणपत चव्हाण (वय २७), आकाश उर्फ काकडी सुरेश दांगडे (२७), करण उर्फ छोटू अनिल धोत्रे (२२), राहुल उर्फ काळ्या नागनाथ कुऱ्हाडे (२५), सतीश उर्फ बांगो बाळू दांगडे (२८), ऋषिकेश गेमू राठोड (२३), महेश उर्फ मामू राजू विटकर (२३), अक्षय नेताजी मोरे (२८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह आकाश मंगळू राठोड (२८), उमेश धर्मा राठोड (२८), राजेश भगवान पवार (२९), महेश मलकाप्पा पुजारी (२८), तुषार बाळू मांजाळकर (३०, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार आनंद बजबळकर यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितानी दुचाकीवरून रॅली काढली. हातात लाठ्या, काठ्या व कोयते घेऊन रॅली काढत दुचाकींचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून लोकांना शिवीगाळ करून रस्त्याच्या बाजूला होण्यास दमदाटी केली. हातातील काठ्या व कोयते हवेत फिरवून त्यांनी परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्या दहशतीला घाबरून लोक भीतीने सैरावैरा पळू लागले होते. या घटनेनंतर पिंपरी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आठ जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक अतुल शेटे तपास करीत आहेत.

 

Web Title: After coming out of jail in the case of murder a case was filed against the gang in Pimprit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.