मुंबईच्या ताज्या घटनेनंतर मोशी येथे होर्डिंग कोसळले; तीन वाहने, एक दुकानाचे नुकसान

By प्रकाश गायकर | Published: May 17, 2024 06:24 PM2024-05-17T18:24:22+5:302024-05-17T18:24:39+5:30

होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असून त्याचे नुतनीकरणही केले नव्हते

After Mumbai's latest incident hoardings collapsed in Moshi Three vehicles, one shop damaged | मुंबईच्या ताज्या घटनेनंतर मोशी येथे होर्डिंग कोसळले; तीन वाहने, एक दुकानाचे नुकसान

मुंबईच्या ताज्या घटनेनंतर मोशी येथे होर्डिंग कोसळले; तीन वाहने, एक दुकानाचे नुकसान

पिंपरी : मोशी येथे होर्डिंग कोसळल्याची घटना गुरुवारी (दि. १६) सायंकाळी घडली. त्या होर्डिंगची मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली असताना देखील होर्डिंग मालकाने त्याबाबत खबरदारी घेतली नाही तसेच मजबुतीकरणाचे नुतनीकरण केले नसल्याने होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आनंद रमणलाल गांधी (३८, रा. महर्षीनगर पुणे), स्ट्रक्चर डिझायनर हेमंत कुमार शिंदे (रा. कात्रज पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महापालिकेच्या वतीने ग्यानचंद हरी भाट यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद पब्लिसिटी या कंपनीचे ४० फूट बाय २० फूट आकाराचे होर्डिंग मोशी मधील तापकीरनगर येथे बसवण्यात आले होते. त्या होर्डिंगच्या मजबुतीकरणाच्या दाखल्याची मुदत संपली होती. तिचे मुदतीत नुतनीकरण केले नव्हते. तसेच या होर्डिंगबाबत कोणतीही खबरदारी घेतली गेली नव्हती. दरम्यान गुरुवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात हे होर्डिंग कोसळले. यामध्ये तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच एका दुकानाचेही नुकसान झाले आहे.

Web Title: After Mumbai's latest incident hoardings collapsed in Moshi Three vehicles, one shop damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.