पिंपरीत महापालिकेच्या पाठोपाठ प्राधिकारणानेही सुरू केली अनधिकृत बांधकामावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 14:04 IST2021-03-03T14:03:35+5:302021-03-03T14:04:34+5:30
अनधिकृत बांधकामावर तीन जेसीबी, पोकलेन व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई

पिंपरीत महापालिकेच्या पाठोपाठ प्राधिकारणानेही सुरू केली अनधिकृत बांधकामावर कारवाई
रावेत : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाठोपाठ आता नवनगर विकास प्राधिकारणानेही अनाधिकृत बांधकामावर कारवाई सुरू केली आहे नवनगर विकास प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्यावतीने ममेली चौकातील अथर्व पार्क परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर तीन जेसीबी, पोकलेन व ब्रेकरच्या साहाय्याने कारवाई करून जवळपास ४००० चौरस फूट बांधकामावर कारवाई करण्यात आली.
शिवाजी पार्क येथील परिसरात अनेक नागरिकांनी वाढीव बांधकामे केली असून, काहींनी अनधिकृत बांधकामे करून खोल्या विकणे आणि भाड्याने दिल्या आहेत. या भागात हा एक प्रकारे धंदा झाला आहे. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व अतिक्रमण पथकाच्या वतीने ममेली चौकाजवळ मुख्य रस्त्यालगत बांधण्यात आलेले दोन मजली दोन इमारती जमीनदोस्त केले. या परिसरातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर जेसीबी व ब्रेकरच्या साहाय्याने चिंचवड पोलीस स्टेशनचे अधिकारी,जवळपास 50 हुन अधिक पोलीस कर्मचारी यांच्या बंदोबस्तात कारवाई केली.