अहवालानंतर बीआरटीला हिरवा कंदील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:06 AM2018-01-03T03:06:44+5:302018-01-03T03:08:01+5:30

सेफ्टी आॅडिट अभावी दापोडी ते निगडी हा बीआरटी मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. सेफ्टी आॅडिटनंतर बीआरटी मार्ग सुरू केला जाणार आहे. सुरक्षा उपाययोजनांची पाहणी पदाधिकारी आणि अधिका-यांनी मंगळवारी केली.

 After the report, the green lantern to the BRT | अहवालानंतर बीआरटीला हिरवा कंदील  

अहवालानंतर बीआरटीला हिरवा कंदील  

Next

पिंपरी - सेफ्टी आॅडिट अभावी दापोडी ते निगडी हा बीआरटी मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. सेफ्टी आॅडिटनंतर बीआरटी मार्ग सुरू केला जाणार आहे. सुरक्षा उपाययोजनांची पाहणी पदाधिकारी आणि अधिका-यांनी मंगळवारी केली. या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता तपासून अपघात होणार नाही, याची दक्षता घेऊनच बीआरटी मार्ग सुरू करावा. या मार्गावर नवीन गाड्या असाव्यात, अशा सूचना पदाधिकाºयांनी प्रशासनास केल्या आहेत.
गेल्या १० वर्षांपासून निगडी ते दापोडी या बीआरटी मार्गाचे काम रखडले होते. या मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी मार्ग आणि सर्वसामान्य वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आहे. त्यामुळे एकाच मार्गावर अनेक प्रकारची वाहतूक असल्याने बीआरटी सुरू करणे अपघातास निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे या मार्गावरील बीआरटीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. श्रावण हर्डीकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा मार्ग सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे.
आयआयटीच्या मदतीने सुरक्षेच्या उपाययोजना बीआरटी मार्गावर करण्यात आल्या आहेत. सेफ्टी आॅडिटसाठी मार्ग सज्ज झाला आहे. या मार्गाची पाहणी महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, सह शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता जुंधारे, बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजणे आदी उपस्थित होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून निगडीतील भक्ती-शक्ती चौक आणि भक्ती-शक्ती चौक ते पिंपरीपर्यंतच्या बीआरटी मार्गाची पाहणी केली.
वीस मिनिटांत प्रवास
दापोडी ते निगडी या मार्गासाठी सध्या ३५ मिनिटांचा कालावधी लागतो. बीआरटीमुळे या वेळेत कपात होणार आहे. सुमारे २० मिनिटांत बस निगडीला पोहोचणार आहे. तसेच दापोडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मार्गात बदल केला आहे. या मार्गाचे काम सुरू असेपर्यंत बीआरटी जुन्या मार्गाने धावेल. हे काम पूर्ण होताच बीआरटी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

महापौर : अपघात होणार नाहीत याची दक्षता घ्या

पिंपरीतील बॅँक आॅफ इंडियासमोरील बस स्टॉपमध्ये बस थांबताच महापौरांनी बसमधून स्टॉपवर उतरतानाचे अंतर कमी आहे, ही बाब लक्षात आणून दिली. यातून अपघात होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना केली. त्यानंतर एम्पायर इस्टेट येथील थांब्यावर बस थांबल्यानंतर रस्ता प्रवासी रस्ता कसा ओलांडणार, असा प्रश्न पक्षनेत्यांनी केला. त्यावर बसमधून उतरल्यानंतर प्रवासी पुढे येऊन बीआरटी लेनच्या कडेला असणारे एक बटन दाबेल आणि त्यानंतर समोरील रस्त्यावरील वाहतूक थांबेल. त्यानंतर प्रवासी रस्ता ओलांडू शकतील. तसेच स्वयंचलित सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे.

वळणावर गोलाकार आरसे
४मार्गावर आकुर्डी बजाज आॅटो, काळभोरनगर येथे अंडरपास आहेत. त्या ठिकाणी रस्ता ओलांडणाºया वाहनांस बीआरटी मार्गावरून वाहन येत आहे, याची माहिती देण्यासाठी वळणावर गोलाकार आरसे लावण्यात आले आहेत, याबाबतची सूचना आयआयटी पवई यांनी केली होती. त्याची उपययोजना केली आहे.
चौकात प्रवाशांना स्वतंत्र मार्ग
४डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह पुढील सर्व महत्त्वाच्या चौकांतील बसथांब्यावरून चौकात येण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र मार्ग केला आहे. तेथून चौकात येऊन प्रवासी झेब्रा क्रॉसिंगचा आधार घेऊन रस्ता ओलांडू शकणार आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडण्याची गरज भासणार नाही.

वाहने थांबण्यासाठी पांढरे पट्टे
४ग्रेड सेपरेटरमधून बीआरटी मार्ग ओलांडणे, तसेच सर्वसामान्य वाहनांसाठी केलेल्या मार्गातून बीआरटी मार्ग ओलांडून ग्रेड सेपरेटर मार्गावर जाण्यासाठी मर्ज इन आणि आऊट येथे वाहनांचा वेग कमी व्हावा, यासाठी पांढरे पट्टे मारलेले आहेत. त्यामुळे मार्गिकेवर येताच वाहनाचा वेग कमी होणार आहे. तसेच मार्गिकेवर हा रूट फक्त बीआरटीसाठी आहे, असे सूचनाफलकही लावल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
एक मिनिटाला एक बस
४दापोडी ते निगडी या बीआरटी मार्गावर विविध मार्गांवरील २३६ बसगाड्या धावणार असून, त्यांच्या पुण्याच्या विविध भागात जाणाºया आणि पुण्यावरून पिंपरी-चिंचवड आणि इतर भागात जाणाºया दिवसाला अडीच हजार फेºया होणार आहेत. त्यामुळे एका मिनिटाला एक बस या मार्गावरून धावणार आहे.

पदाधिकाºयांनी केलेल्या सूचना
४बस आणि स्टॉप यांमधील अंतर तपासावे.
४नवीन बसगाड्याच मार्गावर पाठवाव्यात.
४बीआरटीसाठी एकच तिकीट असावे.
४मार्गिकेवरील अंडरपास येथील आरसे मोठे असावेत.
४ पूर्ण लेनचे काम करावे.

Web Title:  After the report, the green lantern to the BRT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.