PMPML च्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा अजब फतवा, विभागप्रमुखांना माहिती न देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 07:24 PM2023-10-02T19:24:01+5:302023-10-02T19:29:50+5:30
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपी सार्वजनिक संस्था आहे....
पिंपरी :पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) नी सर्व विभागप्रमुख, आगार व्यवस्थापकांना प्रसारमाध्यमांना महामंडळासंदर्भात परस्पर कोणतीही माहिती न देण्याचा फतवा काढला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपी सार्वजनिक संस्था आहे.
विविध आगारांमधून १६०० ते १७०० बसमार्फत सेवा दिली जाते. दररोज १० ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी आणि सेवेबद्दलची माहिती घेण्यासाठी बऱ्याचवेळा संबंधित आगार व्यवस्थापक आणि विभाग प्रमुखांशी संपर्क साधला जातो. पण, काही दिवसांपूर्वी पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी परिपत्रक काढून महामंडळाच्या कामकाजासंदर्भात प्रसारमाध्यमांना परस्पर माहिती न देता सहव्यवस्थापकीय संचालकांच्या मान्यतेने कामगार व जनसंपर्क अधिकारी यांच्यामार्फत माहिती देण्यात यावी, असा आदेश काढले आहेत.
पीएमपीचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी पीएमपीची सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले होते. यात दररोजच्या फेऱ्या, उत्पन्न आणि इतर माहिती संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश दिले होते.