आझमी, पठाण यांच्या विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:17 AM2017-07-31T04:17:44+5:302017-07-31T04:17:44+5:30
भारतात राहून वंदे मातरम् म्हणायला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी व एमआयएम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात
लोणावळा : भारतात राहून वंदे मातरम् म्हणायला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी व एमआयएम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात लोणावळा शिवसेनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी शिवाजीमहाराज चौकात निदर्शने करण्यात आली.
आझमी व पठाण हे दोन्ही नेते कायम संविधानाच्या विरोधात भूमिका घेतात. वंदे मातरम् म्हणणार नाही असे जाहीर करून ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. वंदे मातरम् म्हणण्याची ज्यांना लाज वाटते त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी शहरप्रमुख बबन अनसुरकर, उपशहरप्रमुख मारुती खोले, संजय घोंगे, सुनील इंगुळकर, श्यामबाबू वाल्मिकी, हेमंत मेणे, युवा सेनेचे अजय ढम, यशोधन शिंगरे, नरेश काळवीट, एकनाथ जांभूळकर, सूर्यकांत ढाकोळ, उल्हास भांगरे, नरेश घोलप, अविनाश शिंदे, विशाल गोणते, संकेत भिवडे, दिनेश यादव, महेश यादव, नरेश ढम, अभिषेक इंगुळकर, विनायक खोलासे, अमित फाटक, दीपक जायगुडे, किरण जायगुडे आदी उपस्थित होते.