अकरा अभियंत्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:31 AM2017-07-31T04:31:25+5:302017-07-31T04:31:25+5:30
महापालिकेच्या क क्षेत्रीय हद्दीतील, तसेच वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरणात आणि शहर सुशोभीकरणात अडथळा ठरणाºया उच्च व लघुदाब वीजवाहिन्या हलविण्याच्या कामात
पिंपरी : महापालिकेच्या क क्षेत्रीय हद्दीतील, तसेच वाकड परिसरातील रस्ता रुंदीकरणात आणि शहर सुशोभीकरणात अडथळा ठरणाºया उच्च व लघुदाब वीजवाहिन्या हलविण्याच्या कामात अनियमितता केल्याप्रकरणी विद्युत विभागाच्या ११ अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नऊ अभियंत्यांची वेतनवाढ स्थागित केली आहे, तर निवृत्त कार्यकारी अभियंत्याच्या निवृत्तिवेतनातील पाच टक्के रक्कम रोखण्याचा, तसेच सेवानिवृत्त विकास अभियंत्यावर ठपका ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
विद्युत विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता मिलिंद कपिले, विकास अभियंता अशोक सुरगुडे यांच्यासह कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण, उपअभियंता एकनाथ पाटील, माणिक चव्हाण, नितीन देशमुख, कनिष्ठ अभियंता प्रकाश कातोरे, दमयंती पवार, महेश कावळे, अकबर शेख, अशोक अडसुळे अशी ११ अभियंत्यांची नावे आहेत.