Rohini Hattangadi: नाट्य परिषदेच्या वतीनं जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By विश्वास मोरे | Published: August 8, 2024 05:30 PM2024-08-08T17:30:56+5:302024-08-08T17:32:38+5:30

रोहिणी हट्टंगडी या अशा एकमेव भारतीय कलाकार आहेत, की ज्यांना ब्रिटिश फिल्म अकॅडमी अवॉर्ड प्राप्त झाले आहेत

akhil bhartiy marathi natya parishad announced jivan gaurav award to senior actress Rohini Hattangadi | Rohini Hattangadi: नाट्य परिषदेच्या वतीनं जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Rohini Hattangadi: नाट्य परिषदेच्या वतीनं जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी- चिंचवड शाखेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री  रोहिणी हट्टंगडी यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त नाट्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील राज्य व स्थानिक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. यंदापासून नाट्य चित्रक्षेत्रातील सन्माननीय जेष्ठ कलावंताला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.  येत्या ९ ऑगस्टला संध्याकाळी ५.३० वाजता चिंचवड येथिल प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा सोहळा होणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटनेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे उपस्थित राहणार आहेत.  पुरस्कार सोहळ्यानंतर अजित भुरे हे रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. 

स्थानिक कलावंताचा होणार सन्मान 

याबरोबरच प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, अभिनेता पंकज चव्हाण, अभिनेत्री कोमल शिरभाते, लावणी नृत्यांगना आशा रुपा परभणीकर व नाट्यकर्मी नटराज जगताप यांच्यासह अजून काही सन्माननीय कलावंतांना, त्यांच्या आजवरच्या कार्यासाठी गौरविण्यात येणार आहे. तसेच विधानपरिषदेवर नुकतीच नियुक्ती झालेले कलाप्रेमी श्री अमित गोरखे यांचा विशेष सत्कार होणार आहे. 

रोहिणी  हट्टंगडी या अशा एकमेव भारतीय कलाकार आहेत, की ज्यांना ब्रिटिश फिल्म अकॅडमी अवॉर्ड प्राप्त झाले आहेत. त्यांना हे पारितोषिक सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून  रिचर्ड ॲटनबरो निर्मित ' गांधी 'या चित्रपटातील कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी मिळाले आहे, असेही भोईर यांनी सांगितले.

Web Title: akhil bhartiy marathi natya parishad announced jivan gaurav award to senior actress Rohini Hattangadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.