Pimpri Chinchwad: आकुर्डीत टोळक्याने घरात घुसून मारले, दगडफेक करून वाहन फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 19:38 IST2024-03-06T19:36:59+5:302024-03-06T19:38:09+5:30
आकुर्डी येथील पांढरकर नगरमधील ओम साई सदगुरू या बांधकाम साईटवर सोमवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली...

Pimpri Chinchwad: आकुर्डीत टोळक्याने घरात घुसून मारले, दगडफेक करून वाहन फोडले
पिंपरी : लेबर कॅम्पमध्ये पाचजणांनी मिळून पाचजणांना मारहाण केली. तसेच एका चारचाकी वाहनाची तोडफोड केली. आकुर्डी येथील पांढरकर नगरमधील ओम साई सदगुरू या बांधकाम साईटवर सोमवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
नीलेशकुमार रामसुमेर शर्मा (वय २७, रा. आकुर्डी), नैनेशकुमार श्रीरामराज, महेंद्रकुमार श्रीचंद्रशेखर आणि दोन महिला यामध्ये जखमी झाल्या. नीलेशकुमार यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोट्या, विकी भिसे आणि तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण केली. त्यानंतर घराबाहेर जाऊन नैनेशकुमार श्रीरामराज, महेंद्रकुमार श्रीचंद्रशेखर आणि दोन महिला यांच्यावर दगडफेक करीत त्यांना जखमी केले. यामध्ये कंत्राटदार शंकर काळे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड झाल्याने मोठे नुकसान झाले.