आकुर्डीचे तरुण मित्र मंडळ प्रथम

By Admin | Published: June 10, 2017 02:08 AM2017-06-10T02:08:42+5:302017-06-10T02:08:42+5:30

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील

Akurdi's Tarun Mitra Mandal First | आकुर्डीचे तरुण मित्र मंडळ प्रथम

आकुर्डीचे तरुण मित्र मंडळ प्रथम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत आकुर्डीतील तरुण मित्र मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील १४७ मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून ९२ गणेश मंडळे बक्षिसासाठी पात्र ठरली आहेत.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक निगडीतील जयहिंद मित्र मंडळाला तर तृतीय क्रमांक चिंचवडमधील एस. के. एफ़ गणोशोत्सव, चतुर्थ क्रमांक काळभोरनगर येथील समता मित्र मंडळाला व पाचवा क्रमांक भोसरीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाने मिळविले.
स्पर्धा प्रभाग निहायही घेण्यात आली. ‘अ’ प्रभागात काळभोरनगर येथील राष्ट्रतेज मित्र मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. निगडी गावठाणातील जय बजरंग मंडळ, जाधववाडी मधला पेठातील श्री संत सावतामाळी मंडळ, रुपीनगर येथील दक्षता मंडळ, आकुर्डी गावठाणातील नागेश्वर मित्र मंडळांना अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला.
‘ब’ प्रभागात चिंचवडगाव येथील पागेची तालीम हनुमान मंडळाला प्रथम क्रमांक मिळविला. चिंचवड येथील उत्कृष्ट तरुण मित्र मंडळ, चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मंडळ, चिंचवड, गणेशपेठ येथील अष्टविनायक मित्र मंडळ आणि चिंचवडगावातील अखिल मित्र मंडळांना अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळाला आहे.
‘क’ प्रभागात भोसरी, दिघी रोड येथील नवज्योत गणेश मित्र मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. भोसरी, लांडेवाडीतील आझाद मित्र मंडळ, लोंढे तालीम मित्र मंडळ, दिघी रोड, लक्ष्मीनगर येथील नरवीर तानाजी तरुण मंडळ आणि भोसरीतील खंडोबा मित्र मंडळाला अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळाला आहे.
‘ड’ प्रभागात थेरगाव येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. काळेवाडीतील ज्योतिबा कामगार कल्याण मित्र मंडळ, पिंपरीतील डीडी वॉर्ड फ्रेन्डस सर्कल, पिंपरीगावातील श्री शिवाजी मित्र मंडळ, पिंपळेगुरव येथील श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाला अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळाला आहे.
उल्लेखनीय देखाव्यामध्ये रावेत येथील प्राधिकरण नागरिक समिती, नवी सांगवीतील चैत्रबन मित्र मंडळ, चिंचवड येथील नवजीवन मित्र मंडळ, किवळेतील हनुमान तरुण मित्र मंडळ, पिंपरीतील स्वराज्य प्रतिष्ठान, सुदर्शन स्पोर्ट्स क्लब, चिंचवडमधील लक्ष्मीनगर पार्क मित्र मंडळ, नवी सांगवीतील सांगवी विभागीय मित्र मंडळ, चिंचवडगावातील ज्ञानदीप मित्र मंडळ, पिंपरीतील स्वस्तिक मित्र मंडळ, चिंचवडेनगर येथील जय गुरुदत्त मित्र मंडळ, शिवाजी उदय मित्र मंडळ, रावेत येथील स्वर्गीय संतोष दत्तात्रय भोंडवे प्रतिष्ठान, पिंपळे निलख येथील श्री गणेश मित्र मंडळ आणि पिंपरीतील आझाद मित्र मंडळाला रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.
यंदाचे गणोशोत्साचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. भव्य आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याचे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सांगितले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येत्या सोमवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी सहा वाजता होणार असल्याचेही ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष सुनील रासने, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सचिव माणिकराव चव्हाण, विश्वस्त दंतोपंत केदारी, माजी उपमहापौर कैलास भांबुर्डे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, परीक्षक दत्तात्रय भोंडवे, दिलीप माळी, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, संभाजी सूर्यवंशी, राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Akurdi's Tarun Mitra Mandal First

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.