आळंदी नगर परिषदेच्या विषय समित्या बिनविरोध

By admin | Published: March 22, 2017 03:10 AM2017-03-22T03:10:09+5:302017-03-22T03:10:09+5:30

आळंदी नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी; तसेच सदस्यपदी बिनविरोध निवडी केल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले

Alandi municipal council committee unanimity | आळंदी नगर परिषदेच्या विषय समित्या बिनविरोध

आळंदी नगर परिषदेच्या विषय समित्या बिनविरोध

Next

आळंदी : आळंदी नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी; तसेच सदस्यपदी बिनविरोध निवडी केल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगले यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सुनील जोशी व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत यात्रा समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती, पाणीपुरवठा समिती, मागासवर्गीय कल्याण समित्यांच्या सभापती व प्रत्येकी दोन सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. सदस्यपदांसाठी शिवसेना, तसेच अपक्ष नगरसेवकांकडून नामनिर्देशन अर्ज न आल्याने सर्व जागी भाजपा नगरसेवकांची वर्णी लागली आहे. समितींच्या निवडी बिनविरोध झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)

Web Title: Alandi municipal council committee unanimity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.