अल्पवयीन दुचाकीस्वारांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:18 AM2017-07-31T04:18:49+5:302017-07-31T04:18:49+5:30

कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे.

alapavayaina-daucaakaisavaaraancaa-ucachaada | अल्पवयीन दुचाकीस्वारांचा उच्छाद

अल्पवयीन दुचाकीस्वारांचा उच्छाद

Next

कामशेत : कामशेत शहरासह आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील काही वर्षांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, त्यातही अल्पवयीन दुचाकीचालकांचे प्रमाण अधिक आहे. या अल्पवयीन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सातत्याने पायमल्ली होत असूनही पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार अनेक ज्येष्ठ नागरिक करीत आहेत.
शाळा, खासगी शिकवणी व इतरत्र जाण्यासाठी अनेक धनदांडग्यांच्या मुलांसह सर्वसामान्य नागरिकांची मुले पालकांच्या मर्जीने दुचाकीचा सर्रास वापर करतात. पण वाहतुकीच्या नियमांचे त्यांच्यातील अनेकांकडून उल्लंघन केले जाते.
स्पोर्टबाईक व इतर मॉडीफाय वाहनांची तरुणांसह अल्पवयीन मुलांमध्ये क्रेझ असून, आपल्या वाहनावर विविध प्रकारचे स्टंट करणे, भर चौकातून वाहने अतिवेगात चालवण्यात या अल्पवयीन व तरुण चालकांना मोठी मजा येते. त्याचा इतरांना त्रास होतो याचा विचार त ेकरीतच नाहीत.
विनापरवाना वाहन चालवणे, ट्रिपल सीट बसणे, जोरजोरात व कर्कश हॉर्न वाजवणे, शाळा परिसर व गर्दीच्या ठिकाणी वेगात वाहन चालवणे, रस्त्यावरील वाहन व पादचाºयांना कट मारणे आदी प्रकार या अल्पवयीन व हुल्लडबाज मुलांकडून होत असतात.
याकडे त्यांच्या पालकांबरोबरच पोलिसांचेही दुर्लक्ष होत असल्याने शहर व परिसरात किरकोळ
अपघात घडत आहेत. यातूनच एखादा मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे अनेक पालकांना भूषणाचे वाटत असून, काही पालक तर आपल्या मुलांकडे दुचाकी वाहन देऊन त्याच्या मागे ऐटीत बसत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक अल्पवयीन मुले आपल्या पालकांना रेल्वे स्टेशन व इतरत्र सोडवताना दिसत आहेत.
कामशेतच्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या खड्ड्यांमधून जोरात गाडी चालवून पायी चालणाºया नागरिक, महिला व मुलींच्या अंगावर पाणी उडवणे सर्रास होत आहे. काही हुल्लडबाज तरुण वाहनाच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्याच्या स्फोटाचे आवाज काढतात. तर
गाडीच्या हेडलाइटमध्ये झगमगाटाचे दिवे रात्रीच्या वेळी लावून इतर
वाहन चालकांना त्रासदायक ठरत असून समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
अशा बेफाम चालकांवर जरब बसविण्यासाठी नियमितपणे
कसून तपासणी आणि दोषींवर
कठोर कारवाई करावी. कोणालाही पाठीशी घालू नये अशी मागणी
होत आहे.

Web Title: alapavayaina-daucaakaisavaaraancaa-ucachaada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.